शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कायद्याच्या राखणदारांकडूनच वाहतूक नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:02 IST

हेल्मेटचा वापर नाही : पोलिसांच्या बेशीस्तपणाविषयी नाराजी

नामदेव मोरे ।नवी मुंबई : रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त पोलिसांकडून शहरात सर्वत्र जनजागृती अभियान राबविले जात आहे. नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे; परंतु दुसरीकडे पोलीसच नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. पोलीस हेल्मेटचा वापर करत नाहीत. अनेक ठिकाणी उलट दिशेने प्रवास केला जात आहे. रिक्षामध्ये चालकाच्या बाजूला बसून प्रवास केला जात असून, कायद्याच्या राखणदारांना नियम लागू नाहीत का? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.नवी मुंबई व पनवेलमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अपघात कमी व्हावे व वाहतूककोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे; पण सुरक्षा अभियान राबविणाऱ्या यंत्रणेची स्थिती, ‘दुसºया शिकवी ब्रम्हज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण’ अशी झाली आहे. पोलीस आयुक्तांपासून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपर्यंतचे अधिकारी वाहतूक नियमांचे पालन करतात; परंतु इतर पोलीस कर्मचारी मात्र वाहतूक नियम पायदळी तुडवत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. कोपरखैरणे पोलीस स्टेशनमधून तीन टाकीकडे जाण्यासाठी पोलीस नियमितपणे उलट दिशेने प्रवास करत आहेत. बिनधास्तपणे वाहने उलट्या लेनवरून घेऊन जात असल्याचे नागरिकांना रोज पाहावयास मिळत आहे. पोलीस स्टेशनवरून तीन टाकीकडे जाण्यासाठी डी-मार्ट चौकाला वळसा घालून जावे लागते. हा त्रास टाळण्यासाठी उलट दिशेने मोटारसायकलने प्रवास सुरू असतो. पोलीस कर्मचारी हेल्मेटचाही वापर करत नाहीत. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी नियम तोडले तर चालते व सामान्य नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.नवी मुंबईमध्ये रिक्षामधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करण्याचे प्रमाण जास्त आहे. रिक्षाचालक चार ते पाच प्रवासी बसवत असतात. अशा रिक्षाचालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत; परंतु दुसरीकडे पोलीसच रिक्षाचालकाच्या बाजूला बसून प्रवास करत असल्याचे चित्र वाशी व इतर ठिकाणी पाहावयास मिळत आहे. खाकी वर्दी किंवा वाहतूक पोलिसांचा गणवेश असलेले पोलीस कर्मचारी रिक्षाला हात करतात व त्यांना इच्छित ठिकाणी सोडण्यास भाग पाडतात. रिक्षाचालकाला पैसेही देत नसल्याचे नागरिक पाहत असतात. रिक्षाचालकाच्या बाजूला बसून पोलीस प्रवास करत आहेत.पाट्यांचाही गैरवापरवाहतूक पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पाट्यांवर प्रेस व पोलीस लिहिण्याचे प्रमाण वाढत आहे. वास्तविक या दोन्ही प्रकारच्या पाट्या लिहिणे नियमात बसत नाही; परंतु कारवाई होऊ नये, यासाठी पोलिसांच्या खासगी वाहनांवर व ज्यांचा पोलीस दलाशी संबंध नाही, अशांच्या वाहनांवरही पोलीस असल्याच्या पाट्या झळकू लागल्या आहेत, यामुळे पोलिसांची प्रतिमा बिघडू लागली आहे.नियम सर्वांसाठी सारखेयापूर्वी पामबीच रोडवर एक पोलीस कर्मचाºयाचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता. हेल्मेट न घातल्याने या कर्मचाºयाचा मृत्यू झाला होता. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास अपघात होण्याची व जीव गमावण्याची शक्यता असते. यामुळे पोलीस, पत्रकार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी सर्वांनीच नियमांचे पालन करावे, असे आवाहन दक्ष नागरिकांनी केले आहे.

टॅग्स :Travelप्रवास