शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
5
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
6
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
7
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
8
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
9
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
10
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
11
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
12
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
13
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
14
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
15
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
16
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
17
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
18
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
19
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
20
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
Daily Top 2Weekly Top 5

लॅपटॉप चोरांचा धुमाकूळ; पोलिसांसमोरही आव्हान, कारच्या काचा फोडून करताहेत चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:42 IST

कारची काच फोडून लॅपटॉप व इतर किमती वस्तू चोरी करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. वाहनतळ व हॉटेलसमोर उभ्या केलेल्या कारमधून साहित्य चोरीच्या घटना वाढत असून या चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

नवी मुंबई : कारची काच फोडून लॅपटॉप व इतर किमती वस्तू चोरी करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. वाहनतळ व हॉटेलसमोर उभ्या केलेल्या कारमधून साहित्य चोरीच्या घटना वाढत असून या चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.घणसोलीमध्ये राहणारे लक्ष्मण राजपुरोहित ६ मे रोजी रात्री कोपरखैरणेमधील वरिष्ठ हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून आतमधील लॅपटॉप व इतर साहित्य चोरून नेले. नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये अशाप्रकारच्या घटना नियमित घडू लागल्या आहेत. अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. वाहनाची काच फोडून एक मिनिटापेक्षा कमी वेळेत चोरटे घटनास्थळावरून गायब होत आहेत. त्यांच्याकडील साहित्याने प्रथम कारच्या चारही बाजूला ओरखडा तयार करतात. यानंतर कारच्या मध्यभागी जड वस्तूने किंवा हाताने जोरात धक्का दिला तरी काच लगेच तुटते. हे करण्यास अर्धा मिनिटपेक्षा कमी वेळ लागतो.कारचालकांनी सावध राहावेहॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जाताना किंवा इतर ठिकाणी जाताना कारमध्ये लॅपटॉप व इतर वस्तू ठेवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कारमध्ये ठेवलेले साहित्य चोरीला जाण्याची व काचेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहनही केले आहे.पाच वर्षांत ५४५ लॅपटॉप चोरीलॅपटॉप चोरीच्या घटना गत काही वर्षांमध्ये वाढल्या आहेत. पाच वर्षांमध्ये तब्बल ५४५ लॅपटॉप चोरीला गेले आहेत.यामधील कारच्या काचा फोडून चोरी केल्याच्या घटनांची संख्याही मोठी आहे.चोरीच्या या गुन्ह्यांचा उलगडा होण्याचे प्रमाणही अत्यंत कमी आहे. २०१७ मध्ये १० व २०१८ मध्ये फक्त ४ गुन्ह्यांचाच उलगडा झाला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई