मुलुंडमधील देवीदयाल रोड येथील राजीव गांधी शाळेच्या मैदानाची जागा पुरोहित कॅटरर्सला भाड्याने दिलेली आहे. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक कॅटरर्सच्या मंडपाने पेट घेतला. तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. तीन तास उलटले तरी आगीचे तांडव सुरू असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनास्थळी ४ अग्निबम्ब, २ पाण्याचे टँकर आणि १ रुग्णवाहिका धाडण्यात आल्या. त्यात तेथे असलेल्या सिलिंडरनेही पेट घेतल्याने आगीचा भडका आणखी उडाला होता. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते़ या आगीमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मुलुंडच्या आगीत लाखोंचे नुकसान
By admin | Updated: October 27, 2014 01:09 IST