शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

शहरात आंतरक्रीडा संकुलाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:51 IST

महापालिकेची उदासीनता; खेळाडूंना सुविधांचा वानवा

- योगेश पिंगळेनवी मुंबई : नवी मुंबई शहरात वास्तव्य करणाऱ्या अनेक खेळाडूंनी विविध क्रीडा क्षेत्रात विभाग, राज्य तसेच राष्टीय पातळींवर चमकदार कामगिरी करत शहराचा नावलौकिक उंचावला आहे; परंतु या खेळाडूंना महापालिकेच्या माध्यमातून सरावासाठी सुविधा नसल्याने त्यांना इतर शहरात जावे लागत आहे. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सर्वसमावेशक सुविधा असलेले आंतरक्र ीडा संकुल बांधण्यात न आल्याने शहरात नवनवीन खेळाडू घडण्यासही अडचणी येत आहेत.नवी मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या वतीने तायक्वांडो, कबड्डी, बुद्धिबळ अशा काही क्र ीडा प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येते होते. या प्रशिक्षणाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात अनेक पदक मिळवून दिली असून पालिका शाळांचादेखील नावलौकिक वाढलेला आहे; परंतु महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाºया सोई-सुविधांची कमतरता असल्याने शहरात खेळाडू घडविण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न अपुरे पडत आहेत. चार हजार कोटी रुपयांचे आर्थिक बजेट असलेल्या महापालिकेचे सीबीडी येथे एकमेव राजीव गांधी क्रीडा संकुल असून, नेरु ळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान बनविण्यात आले आहे; परंतु शहरात सर्व सुविधांयुक्त पालिकेचे एकही आंतरक्र ीडा संकुल नाही. त्यामुळे बॅडमिंटन, टेबलटेनिस, कराटे, त्वायक्वांडो, जिमन्यास्टिक, बॉक्सिंग, योगा, कॅरम, बुद्धिबळ, शूटिंग रेंज यासारख्या खेळांपासून शहरातील खेळाडू, शालेय विद्यार्थी तसेच क्रीडाप्रेमींना वंचित राहावे लागत आहे. शहरातील प्रत्येक नोडमध्ये सर्व सुविधांयुक्त आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा वास्तू बनवून त्याचा शहरातील नागरिकांना लाभ मिळणे अपेक्षित होते; परंतु तसे न झाल्याने नवीन क्र ीडा खेळाडू घडण्यावर त्याचा परिणाम होत आहे. क्रीडाच्या विविध वास्तू बांधण्यासाठी महापालिकेकडे अनेक भूखंड हस्तांतरित झाले आहेत; परंतु या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास महापालिका प्रशासन उदासीन असल्याचा आरोप खेळाडू करत आहेत. नवी मुंबई शहरात आॅलिम्पिक पात्र असलेले आणि विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी करून. विभाग-राज्य तसेच राष्टीय पातळींवर चमकदार कामगिरी करून शहराचे नावलौकिक उंचावलेल्या खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या खेळाडूंना नियमित सरावासाठी शहरात महापालिकेच्या किंवा खासगी संस्थांच्या सुविधा नसल्याने या खेळाडूंना सरावासाठी भिवंडी, पुणे आदी भागात जावे लागत आहे.जलतरण खेळाडू सरावासाठी शहराबाहेरनवी मुंबई शहरात आॅलिम्पिक पात्र असणारे खेळाडू राहतात. शहरात महापालिकेचा किंवा खासगी संस्थेचा आॅलिम्पिक दर्जाचा ५० मीटरचा तरणतलाव नसल्याने, या खेळाडूंना शासनाच्या पुणे बालेवाडी येथील जलतरण तलाव असलेल्या ठिकाणी सरावासाठी जावे लागत आहे.अ‍ॅथलेटिक सिंथेलिक ट्रॅकची कमतरतामुंबई, ठाणे, पुणे आदी शहरात महापालिकेने ४०० मीटरचा अ‍ॅथलेटिक सिंथेलिक ट्रॅक बनविले आहेत. नवी मुंबई शहरात आंतररष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त खेळाडू वास्तव्य करतात; परंतु नवी मुंबई शहरात सरावासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना इतर शहरांमध्ये जावे लागत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई