शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेचे तीन नियंत्रण कक्ष; मान्सून वेळापत्रक १५ जूनपासून लागू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:41 IST

नियंत्रण कक्षासह संवेदनशील ठिकाणी ३६५ कर्मचारी तैनात

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: कोकण रेल्वे काॅर्पोरेशनने मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली असून, पावसाळ्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. सुरक्षित प्रवास, नियंत्रण आणि उत्तम दर्जाची प्रवासी सुविधा या तिन्ही आघाड्यांवर कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात  रेल्वे वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही, यादृष्टीने बेलापूर, रत्नागिरी, मडगाव येथे नियंत्रण कक्षासह संवेदनशील ठिकाणी ३६५ कर्मचारी तैनात केले असल्याचे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोकण रेल्वेचा सुमारे ७३८ किलोमीटरचा मार्ग डोंगराळ, जंगलवाटा आणि समुद्रकिनारी झपाट्याने बदलणाऱ्या हवामानातून जातो. त्यामुळे  दर पावसाळ्यात रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहते; मात्र यंदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष उपाययोजना केल्याची माहिती घेण्यासाठी पत्रकार परिषदेत घेतली. 

सहा ठिकाणी वैद्यकीय पथक कार्यरत

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी  कोकण रेल्वेने बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथील नियंत्रण कक्ष २४ बाय ७ कार्यरत ठेवले आहेत. तसेच चिपळूण, रत्नागिरी, वर्ना, मडगाव, कारवार आणि उडपी या ठिकाणी वैद्यकीय पथक सज्ज ठेवले आहे.  विशेष म्हणजे हे मान्सून वेळापत्रक १५ जून ते २० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लागू राहणार आहे. या कालावधीत हवामानातील बदल लक्षात घेता, गाड्यांच्या गतीमध्ये विभागीय पातळीवर बदल केल्याचे झा यांनी सांगितले. याप्रसंगी कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर हेसुद्धा उपस्थित होते.

विशेष उपाययोजना

  • भूस्खलनप्रवण भागांत संरक्षणात्मक कामे,  मडगाव-रत्नागिरी मार्गावरील दरडप्रवण भागांत संरक्षक जाळ्या, स्लोप स्टॅबिलायझेशन, पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी ड्रेनेज कामे.
  • ड्रेनेज व पुलाखालच्या भागांची स्वच्छता पूर्ण. सुमारे १२०० ठिकाणी जलवाहिन्यांची व नाल्यांची स्वच्छता. पाण्याच्या निचऱ्यासाठी अतिरिक्त जलवाहिनी.
  • संभाव्य धोक्याच्या भागांत रेल्वे ट्रॅकवर रात्रंदिवस पेट्रोलिंग करणारे आणि वॉकी-टॉकी व आवश्यक साधनांनी सुसज्ज कर्मचारी तैनात.
  • प्रत्येक संवेदनशील स्टेशनवर जेसीबी, क्रेन, वैद्यकीय सुविधा व आपत्कालीन साहित्यासह बचाव पथक सज्ज.
टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वे