शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

मुलाचा आवाज ‘एआय’ क्लोन करून फसवणूक; बलात्काराच्या गुन्ह्यात पकडल्याचे सांगत गंडा

By सूर्यकांत वाघमारे | Published: March 08, 2024 1:57 PM

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुलाला पकडले असून, अटक टाळण्याच्या बहाण्याने हे पैसे उकळले आहेत.

नवी मुंबई : जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचे कौतुक होत असतानाच त्याद्वारे फसवणुकीच्या घटनाही घडू लागल्या आहेत. ‘एआय’चा वापर करून वडिलांना मुलाचा आवाज ऐकवून एक लाख रुपये उकळल्याची घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुलाला पकडले असून, अटक टाळण्याच्या बहाण्याने हे पैसे उकळले आहेत.

सीवूड परिसरात राहणाऱ्या शिक्षकासोबत हा प्रकार घडला आहे. ते मंगळवारी सायन येथील कॉलेजमध्ये असताना त्यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून व्हॉट्सॲप कॉल आला. फोनवरील व्यक्तीने आपण ‘सीबीआय’मधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या मुलाला बलात्काराच्या गुन्ह्यात पकडले असून, कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी केली. या शिक्षकाला विचार करण्याचीही संधीही न देता फोन सुरू असतानाच निर्णय घेण्यास भाग पाडले. त्यासाठी फोनवरून लेकाचे बोलणेही करून देण्यात आले. त्यामुळे भयभीत झालेल्या वडिलांनी मुलाची अटक टाळण्यासाठी संबंधितांच्या सांगण्याप्रमाणे विविध खात्यांवर एक लाख रुपये पाठवले. यानंतर मात्र त्यांचे मुलासोबत बोलणे झाले असता, मुलगा तर घरीच असल्याचे समोर आले. यामुळे त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत मुलाला सांगितले असता फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

मोबाइल ॲपद्वारे चोरला आवाज?संबंधित मुलाचा आवाज वडिलांना ऐकविण्यासाठी अगोदर बाप-लेकाचे फोनवरील संभाषण रेकॉर्ड केले गेले का, असाही प्रश्न निर्माण होत आहे. अथवा नागरिकांचे आवाज चोरण्यासाठी मोबाइलमधील ॲप्लिकेशनचा वापर होतोय का, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. 

...यापूर्वीही गैरवापरकेरळमध्ये नुकतेच देशातील पहिल्या ‘एआय’ शिक्षिकेला प्रत्यक्षात आणले आहे. दुसरीकडे मात्र फसवणुकीच्या अशा घटना समोर येत आहेत. काही महिन्यांपूर्वी ‘एआय’द्वारे काही अभिनेत्रींचे चेहरे इतर महिलांना वापरून त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनेदेखील ‘एआय’च्या धोक्याची घंटा वाजवली होती.

सांकेतिक संवाद गरजेचाअडचणीच्या प्रसंगी आपसात संवाद साधताना कुटुंबातील व्यक्तींनी संभाषणात सांकेतिक शब्दांचा उल्लेख ठेवला पाहिजे. त्याद्वारे फोनवरील व्यक्ती खरी आहे की खोटी हे ओळखण्यास मदत होऊ शकते.  

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सCrime Newsगुन्हेगारी