रसायनी - आळी आंबिवली, मोहोपाडा येथे राहणाऱ्या जयेश काशिनाथ खुडे या तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी रसायनी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ खुडे यांचा मुलगा जयेश १० एप्रिलला घरातून कामानिमित्त बाहेर गेला तो परत आलाच नाही. शोधाशोध करूनही त्याचा तपास न लागल्याने, अखेर कुटुंबीयांनी ११ एप्रिलला पोलीस स्टेशनमध्ये तो हरविल्याची तक्रार दाखल केली होती. १३ एप्रिलला चावणे गावच्या हद्दीमध्ये पेट्रॉनास कंपनीकडे जाणाºया रोडलगत नाल्यात त्याचा मृतदेह आढळला. जांभिवलीच्या पोलीस पाटलांनी या विषयी पोलिसांना माहिती दिली. रसायनी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृताच्या छातीवर जखमा आढळून आल्या आहेत. विश्वनाथ गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
रसायनीमध्ये तरुणाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 04:21 IST