शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कोलकातामधील अपहृत मुलीची सुटका, सहा तासांत केली आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 00:52 IST

हबीबमुल्ला अंचर मुल्ला (२८) असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नवी मुंबई : कोलकाता येथून नोकरीच्या आमिषाने पळवून आणलेल्या १५ वर्षीय मुलीची पोलिसांनी उलवे येथून सुटका केली आहे. दिल्ली येथील एका संस्थेमार्फत पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळाली होती. त्यानुसार तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी सदर मुलीचा शोध घेऊन अवघ्या सहा तासांत तिची सुखरूप सुटका केली.हबीबमुल्ला अंचर मुल्ला (२८) असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार अशरफउल शाएब मोल्ला उर्फ बाबू हा पश्चिम बंगालला पळाला असून कोलकाता पोलीस त्याचा शोध घेत आहेत. १५ वर्षांची पीडित मुलगी ही कोलकातामधील चोवीस परगना परिसरात राहणारी आहे. हबीबमुल्ला हादेखील त्याच परिसरातील राहणारा असल्याने दोघांची ओळख होती.या ओळखीतून हबीबमुल्ला व अशरफउल या दोघांनी सदर अल्पवयीन मुलीला मुंबईत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले होते. यानंतर तिला उलवे येथील बामणडोंगरी परिसरात ठेवण्यात आले होते. तर तिला नवी मुंबईत सोडल्यानंतर अशरफउल हा पुन्हा पश्चिम बंगालला पळून गेला होता. सदर अल्पवयीन मुलीला नोकरीचे आमिष दाखवून अनैतिक धंद्यासाठी वापरण्याचा त्यांचाकट होता.तत्पूर्वीच सदर मुलीच्या अपहरणाची माहिती दिल्ली येथील शक्ती वाहिनी या सामाजिक संस्थेने नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या ई-मेलवर कळवली होती. त्यानुसार गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचेवरिष्ठ निरीक्षक अर्जुनगरड यांनी सहायक निरीक्षक सुनीता भोर, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, जे. ए. सूर्यवंशी आदीचे पथक तयार केले होते. त्यांनी तांत्रिक तपासाद्वारे उलवे सेक्टर १९ येथे झाडाझडती घेतली असता, हबीबमुल्ला याच्या घरात ती आढळून आली. या वेळी तिची सुखरूप सुटका करून पोलिसांनी हबीबमुल्ला यालाअटक केली.दोन आठवड्यात पाच मुलींची सुटकागुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मागील दोन आठवड्यात उलवे येथील घटनेसह इतर चार गुन्ह्यांचा उलगडा करून अपहृत अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. कल्याण, औरंगाबाद, नेरुळ यासह कळंबोली परिसरातून या मुलींचा शोध घेण्यात आला. विविध कारणांनी या मुलींना फूस लावून पळवण्यात आले होते. मात्र, त्यासंबंधीची तक्रार प्राप्त होताच गुन्हे शाखेच्या पथकाने चारही गुन्ह्यातील मुलींची सुटका करून संबंधितांना अटक केले आहे. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीसठाण्यात दोन तर नेरुळ व कळंबोलीतही गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी