शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

खारघरमधील जमीन गैरव्यवहाराची चौकशी आता अंतिम टप्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 06:20 IST

सिडको प्रशासनाची माहिती : १५ वर्षांमधील व्यवहारांचीही चौकशी

नवी मुंबई : खारघरमधील जमीन गैरव्यवहार व कोयना प्रकल्पग्रस्तांना १५ वर्षांमध्ये वाटप केलेल्या जमीन व्यवहाराची शासनाच्या आदेशावरून चौकशी सुरू आहे. ही चौकशी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती सिडको प्रशासनाने दिली आहे.कोयना प्रकल्पग्रस्तांना खारघर येथील ओवे गावच्या हद्दीमधील सर्वे क्रमांक १८३ मधील जमीन देण्यात आली होती. १४ मे २०१८ मध्ये एकाच दिवशी या जमिनीचा व्यवहार झाला. प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप ज्या दिवशी झाले त्याच दिवशी त्याचे हस्तांतरण बांधकाम व्यावसायिकाकडे झाले. बांधकाम व्यावसायिकाला ३ कोटी ६० लाख रुपयांना ही जमीन देण्यात आली. प्रत्यक्षात बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत १७६७ कोटीपेक्षा जास्त असल्याचा आरोप काँगे्रसने केला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खारघरमधील जमीन व मागील १५ वर्षांमध्ये प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या जमीन व्यवहारांचीही चौकशी करण्याचे आदेश दिले होते. शासनाच्या आदेशानंतर ३ आॅक्टोबर २०१८ ला एक सदस्यीय समिती नेमण्यात आली होती.सिडकोने ही चौकशी प्रगतिपथावर असल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले आहे. जमीन व्यवहाराची चौकशी करण्यासाठी सिडकोने वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन नागरिकांकडून यासंबंधीत काही कागदपत्र असल्यास किंवा काही आक्षेप असल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन केले होते. १५ ते ३० जानेवारी दरम्यान माहिती देण्यासाठीचा कालावधी ठेवण्यात आला होता. या चौकशीच्या पहिल्या टप्प्यामध्ये समितीकडे काही माहिती प्राप्त झाली आहे. अजून कागदपत्र प्राप्त होणे बाकी आहे. सद्यस्थितीमध्ये मिळालेल्या माहितीची छाननी करून समितीच्या अध्यक्षांनी चौकशीच्या दुसऱ्या टप्प्यात गरजेनुसार नवीन पत्रव्यवहार केला असून या प्रकरणाशी संंबंधितांकडून माहिती मागविली आहे. चौकशीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते पूर्ण केले जाणार असल्याचेही सिडकोने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :cidcoसिडको