शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

कर्जत पं. समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीला गळती

By admin | Updated: June 22, 2017 00:16 IST

राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिलेल्या निधीमधून तीन कोटी रु पये खर्चून बांधण्यात आलेली

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिलेल्या निधीमधून तीन कोटी रु पये खर्चून बांधण्यात आलेली प्रशासकीय इमारत कधी खुली होणार हा प्रश्न आहे. कारण २२ फेब्रुवारी २०१७ रोजी उद्घाटन करण्यात आलेल्या या प्रशासकीय इमारतीमध्ये अद्याप कर्जत पंचायत समितीचा कोणताही विभाग हलविण्यात आला नाही. प्रशासकीय इमारतीमधून कारभार लवकर सुरू करण्याची मागणी तालुक्यातील ग्रामस्थांची असताना, करण्यात येत असलेली चालढकल तालुक्याच्या विकासाला बाधक असल्याचे बोलले जात आहे. मात्र कोट्यवधी रु पये खर्चून पूर्ण करण्यात आलेल्या या इमारतीमधील अनेक भिंतींना स्लॅबमधून होणाऱ्या पाणी गळतीचा सामना करावा लागत आहे. भिंती ओलसर असल्याने पहिल्याच पावसात इमारतीचा स्लॅब गळू लागल्याने उलटसुलट चर्चांना कार्यालयात ऊत आला आहे.दुमजली असलेल्या कर्जत पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनानंतर नवीन इमारतीत कार्यालये हलविली जातील अशी अपेक्षा होती. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी कर्जत पंचायत समिती आजही गोदामातून कारभार करीत आहे. या कार्यालयात वीजपुरवठा खंडित झाला की संपूर्ण कार्यालयात काळोखाचे साम्राज्य असते. अशावेळी सर्व कारभार बंद ठेवावा लागतो. त्यामुळे कर्जत तालुक्याच्या विविध भागातून येणाऱ्या ग्रामस्थांची कामे पूर्ण होत नाहीत. तालुक्यातील ग्रामस्थांनी अनेकदा तक्र ारी केल्यानंतर कर्जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये कामकाज सुरू करण्यासाठी महापूजा घालण्यात आली या वेळी भिंती ओलसर असल्याचे दिसून आले. पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी यांनी हजेरी लावलेल्या १९ जूनच्या नंतर नक्की कधीपासून कारभार सुरू होणार याबद्दल कोणीही ठोस माहिती देत नाही. या इमारतीचे काम करणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. ए. केदार यांनी फर्निचरची कामे पूर्ण करायची असल्याचे उत्तर दिले. मात्र या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भिंती पहिल्याच पावसात ओल्या झालेल्या दिसून येत आहेत. दोन्ही मजल्यावर अनेक भागात भिंती ओलसर असल्याने या इमारतीचा स्लॅब लिकेज आहे काय? याचा शोध आता जिल्हा परिषद बांधकाम विभागाला घ्यावा लागणार आहे. भिंती ओल्या असल्याने त्या ठिकाणी नवीन फर्निचर लावल्यास ते देखील खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रशासकीय इमारतीमधून नक्की कधी कारभार सुरू होणार हे कोणीही आज सांगू शकत नाही. त्यामुळे महापूजा झाली तरी कार्यालय स्थलांतरित होण्याची तारीख अनिश्चित आहे. आत्ता पुढे काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.तीन कोटी खर्चून कर्जत पंचायत समितीची प्रशासकीय इमारत उभी करण्यात आली असून जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व सरकारी कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी ही इमारत मदतगार ठरणार आहे. सध्या कर्जत शहरातील वेगवेगळ्या भागात जिल्हा परिषदेशी संबंधित कार्यालये असून त्यापैकी अनेक कार्यालये ही अनेक वर्षे भाड्याच्या जागेत आहेत. अशी सर्व कार्यालये नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये एकत्र आल्यास कर्जत तालुक्याच्या विविध भागातून येणाऱ्या सर्व ग्रामस्थांना एकाच ठिकाणी आपली कामे करता येणार आहेत. कर्जत पंचायत समितीच्या २२ फेब्रुवारी २०१७ रोजी उद्घाटन करण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, अतिरिक्त गटविकास अधिकारी, शिक्षण, लघु पाटबंधारे,कक्ष अधिकारी, कार्यालय प्रमुख, लेखापाल, विरोधी पक्ष, ग्रामपंचायत विभाग, सामान्य प्रशासन, बांधकाम, आरोग्य, महिला बालविकास, पशुधन, सर्व शिक्षा अभियान अशी सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी प्रशासकीय इमारत बांधली आहे.