शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेचे वावडे, एमसीएच्या विनंतीला पालिकेकडून केराची टोपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 02:05 IST

मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या १६ वर्षे वयोगटाखालील संघाच्या निवडीसाठी बेंच मार्क मानल्या जाणाऱ्या कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेविषयी मात्र महापालिकेला वावडे असल्याचे दिसून आले आहे.

नवी मुंबई  - मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या १६ वर्षे वयोगटाखालील संघाच्या निवडीसाठी बेंच मार्क मानल्या जाणाऱ्या कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेविषयी मात्र महापालिकेला वावडे असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबई विभागात खेळविल्या जाणाºया सामन्यांसाठी मैदान उपलब्ध करून देण्याची विनंती एमसीएने महापालिकेकडे केली होती; परंतु महापालिकेच्या क्रीडा विभागाने आचारसंहितेचे कारण पुढे करून एमसीएच्या या विनंतीला केराची टोपली दाखविली आहे.कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेचे यंदाचे २९ वे वर्ष आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षे वयोगटाखालील संघासाठी खेळाडूंची निवड केली जाते. ही स्पर्धा आठ विभागांत खेळविली जाते. या वर्षी ४ मे पासून या स्पर्धा सुरू झाल्या आहेत. यात जवळपास ३५० खेळाडू खेळणार आहेत. नवी मुंबईतील दोन संघ असून, त्यांच्यात सहा सामने खेळविले जाणार आहेत. या सामन्यांसाठी मैदान उपलब्ध करून देण्याची विनंती एमसीएने महापालिकेकडे केली होती; परंतु महापालिकेच्या क्रीडा विभागाने आचारसंहितेचे कारण पुढे करून क्रिकेटबाबतची आपली उदासीनता दाखवून दिली आहे. एकीकडे शहरातून चांगले क्रिकेटपटू तयार व्हावेत, या दृष्टीने विविध सुविधा पुरविल्या जात असल्याचा कांगावा महापालिकेच्या वतीने केला जात आहे, तर दुसरीकडे उदयोन्मुख क्रिकेटपटूंच्या पंखांना बळ देणाºया स्पर्धांबाबत मात्र नकारात्मक दृष्टिकोन बाळगला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.मैदान वगळता या स्पर्धेचा संपूर्ण खर्च आयोजक क्लबच्या माध्यमातून करण्यात येतो; परंतु या स्पर्धा त्या त्या विभागात पार पडल्यास खेळाडूंची दमछाक होणार नाही, तसेच स्थानिक स्तरावर क्रिकेट आणि त्या अनुषंगाने या स्पर्धेचा प्रचार होईल, अशी आयोजकांची भूमिका आहे. काही वर्षांपूर्वी विभागीय सामने खेळण्यासाठी मुंबई किंवा ठाणे येथे जावे लागत असे. परंतु मागील वर्षापासून या स्पर्धा नवी मुंबईतच खेळविल्या जात आहेत. या वर्षी हे सामने महापालिकेच्या सीबीडी येथील राजीव गांधी स्टेडिअमवर खेळविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला होता. या संदर्भात एमसीएनेही महापालिकेला विनंती केली होती. मात्र, क्रीडा विभागाने आचारसंहितेचे कारण देऊन या स्पर्धेला बगल दिल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे.कल्पेश कोळी स्मृती स्पर्धेचे महत्त्वमुंबई क्रिकेट असोसिएशनने देशाला अजित वाडेकर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे आदी नामांकित खेळाडू दिले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षे वयोगटाखालील संघ निवडीसाठी या स्पर्धा महत्त्वाच्या मानल्या जातात. अजिंक्य राहणे, रोहित शर्मा, अजित आगरकर, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, संजय बांगर, वासिम जाफर व पृथ्वी शॉ यांच्यासारखे दिग्गज खेळाडू या स्पर्धा खेळले आहेत.या स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून द्यावे, यासाठी महापालिकेला पत्र दिले होते; परंतु आचारसंहिता असल्याचे कारण देऊन ही मागणी फेटाळून लावली. एका चांगल्या स्पर्धेबाबत महापालिकेची उदासीनता निराशा करणारी आहे.- विकास साटम, समन्वयक,क्रिकेट स्पर्धा, नवी मुंबई विभागउदयोन्मुख खेळाडूंसाठी या स्पर्धा महत्त्वाच्या असल्याने त्याच्या आयोजनासाठी महापालिकेने नेहमीच मदतीचा हात दिला आहे. परंतु आचारसंहितेमुळे यावर्षी मैदान उपलब्ध करून देण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या.- रेवप्पा गुरव,क्रीडा अधिकारी, महापालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई