धुवाधार पावसाने कळंबोली वसाहत जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:54 PM2019-07-27T23:54:48+5:302019-07-27T23:54:59+5:30

पनवेल परिसरात गेल्या चार दिवसापासून पाऊस सुरू आहे. शनिवारी सकाळी पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले.

The Kalamboli colony is flooded by torrential rains | धुवाधार पावसाने कळंबोली वसाहत जलमय

धुवाधार पावसाने कळंबोली वसाहत जलमय

Next

कळंबोली : पनवेल परिसरात गेल्या चार दिवसापासून पाऊस सुरू आहे. शनिवारी सकाळी पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. कळंबोलीतील रस्त्यावर जिकडे तिकडे पाणीच पाणी साचले होते. त्यातून मार्ग काढणे जिकरीचे बनले होते.
पनवेल परिसरात गेल्या काही दिवसापासून पावसाने उसंत घेतली होती. मात्र बुधवारी सकाळपासूनच दमदार हजेरी लावली. बहात्तर तासानंतही पावसाचे जोर कायम राहील्याने
सखल भागात गुडख्या इतके पाणी साचल शनिवारी सकाळी सुध्दा जोर कमी झाला नव्हता. त्यामुळे परिसरातील चाकरमान्यांची त्रेधातिरपीट उडाली.
कळंबोलीत नालेसफाई व्यवस्थीत न झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही. पाणी रस्त्यावर दीड ते दोन फुट साचले होते. करवली नाका, सुधागड शाळा, स्टेट बँक, सेंन्ट जोसेफ शाळा समोरील रस्ता पाण्याखाली गेला होता. सेक्टर ४, ५, ८,१०, १४ पाणीच पाणी झाले होते. स्टेट बँक ते मंगलेश्वरी माता मंदीर दरम्यानचा रस्ता पाण्यात बुडून गेला होता. बँक आँफ इंडियासमोरील रस्त्यावर पावसाच्या पाण्यात दोन तीन दुचाकी बंद पडल्या. स्मृती उद्यानाजवळही पाणी साचले होते. सेक्टर ६ येथील न्यु इंग्लिश स्कूल समोरील उद्यानात पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. महानगर गॅस पंपाच्या समांतर पनवेल-सायन महामार्गावरील पाणी जाण्याकरीता मार्ग नसल्याने पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतुक सकाळी खोळंबली होती. त्यामुळे द्रुतगती महामार्गावर वाहनांचा लांबच लांब लागल्या होत्या.

महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर
पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत शनिवारी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशानुसार अधिकारी तसेच कर्मचारी रस्त्यावर उतरले. नवीन पनवेल सेक्टर १३ , ओएनजीसी रेल्वे पुलाखाली, कोळीवाडा, करंजाडे पुलालगत, वेलकम हॉटेल त्याचबरोबर जिथे जिथे उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे तिथे तिथे कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत रहिवाशांच्या मदतीला धावले.

नवीन पनवेलही पाण्यात
गेल्या चार दिवसापासून पाऊस पडत असल्याने नवीन पनवेल सुध्दा पाण्यात गेल्याने प्रवाशांची त्रेधातिरपीट उडाली. सेक्टर १३ मध्ये संपूर्ण रस्त्यावर गुढगाभर पाणी साचले आहे. पदपथ सुध्दा पाण्याखाली गेला आहे. वाहनासाठी हा रस्ता महानगरपालिकेने सकाळपासूनच बंद केला आहे. त्याचबरोबर ए टाईप मध्येही घरात पाणी शिरले होते. सेक्टर १७ मधील ही परिस्थिती वेगळी नाही .

Web Title: The Kalamboli colony is flooded by torrential rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.