शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम : मान्यवरांनी मांडले विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 00:07 IST

मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस म्हणजेच ६ जानेवारी, या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.

पनवेल : मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस म्हणजेच ६ जानेवारी, या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त पनवेलमधील ज्येष्ठ पत्रकार, तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यासाठी आ. प्रशांत ठाकूर, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, मुंबई ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, साई संस्थान वहाळचे अध्यक्ष रवी पाटील, गणेश कडू, दर्शना भोईर, सुरेखा मोहोकर, वृषाली वाघमारे, अ‍ॅड. मनोज भुजबळ, शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, काँग्रेसचे सुदाम पाटील, मनोहर म्हात्रे, तेजस कांडपिळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती लाभली.लोकशाहीमध्ये पत्रकारांचे स्थान अभेद्य आहे. ब्रिटिश काळात दर्पण हे अन्यायाला वाचा फोडणारे असे वृत्तपत्र तयार झाल्याची माहिती यावेळी उपविभागीय दत्तात्रय नवले यांनी दिली. तर दर्पण या नावातच सर्वकाही आहे, त्या काळातील पत्रकारिता आणि आताच्या पत्रकारितेचे स्वरूप बदलले असून, मीडियामध्ये तंत्रज्ञान वाढल्याची माहिती विनायक पात्रुडकर यांनी उपस्थितांना दिली.कोकण शिक्षक मतदार संघांच्या पत्रकारांनी, आपली लेखणी अबाधित ठेवण्याचे काम मराठी वृत्तपत्रसृष्टीमध्ये कायम ठेवल्याचे सांगितले.पत्रकारिता क्षेत्र नवनवीन बदल आणि आव्हाने पेलण्यासाठी सक्षम असल्याचे आजपर्यंतच्या प्रवासातून दिसून आल्याचे मत प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. पत्रकारिता हे एक वेगळं रसायन असल्याचे विचार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले.>महापालिकेत कार्यक्रमपनवेल महानगर पालिकेत बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करीत मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी पालिका मुख्यालयात छोटेखानी कार्यक्रम आयोजित केले होते. कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकराच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. मराठी पत्रकारितेची सुरुवात पत्रकारितेचे बदललेले स्वरूप याबाबत आयुक्तांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ प्रशांत रसाळ, उपायुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त संजय शिंदे आदी पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.