शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जेएनपीटीने केले २७ हजार कोटींचे सामंजस्य करार; भारतातील बंदर आधारित औद्योगिकीकरणाचे होणार सक्षमीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 23:47 IST

भारतातील बंदर आधारित औद्योगिकीकरणाचे होणार सक्षमीकरण

उरण : २ ते ४ मार्च २०२१ दरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या ‘मेरिटाइम इंडिया समिट २०२१’च्या पार्श्वभूमीवर जेएनपीटीने बुधवारी (२४ फेब्रुवारी) बंदर प्रकल्प, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि जेएनपीटी सेझमधील भूखंडांच्या विकासासाठी संभाव्य गुंतवणूकदारांशी २७००० कोटी रुपयांच्या ३० सामंजस्य करारांवर  जेएनपीटीचे अध्यक्ष  संजय सेठी यांनी  स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ उपस्थित होते. 

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे देशातील एक प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करणाऱ्या प्रमुख कंपन्यांमध्ये डीपी वर्ल्ड, जे. एम. बक्शी ॲण्ड कंपनी, गणेश बेंझो, बीपीसीएल, एनआईटीआईई, एस.एस.जी. फार्मा प्रा.लि., सूरज ॲग्रो, जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक प्रा.लि., सिनलाइन इंडिया लिमिटेड या कंपन्यांचा समावेश असून, त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग, आयटी सर्व्हिसेस, वेअरहाउसिंग, कोल्ड स्टोरेज, एफटीडब्ल्यूझेड, फार्मा, कन्फेक्शनरी मॅन्युफॅक्चरिंग, अभियांत्रिकी सेवा, फूड प्रोसेसिंग संबंधी सामंजस्य करार केले आहेत. 

भारतीय बंदरे आणि सागरी क्षेत्रातील देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीस चालना देण्यासाठी केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग राज्यमंत्री  मनसुख मंडावीया यांच्या पुढाकारातून मार्च २०२१ मध्ये ‘मेरिटाइम इंडिया समिट २०२१’चे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ४ मार्च २०२१ दरम्यान आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय शिखर संमेलन व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘एमआयएस २०२१’चे उद्घाटन करण्यात येणार असून केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग राज्यमंत्री  मनसुख मंडावीया यांचे भाषण होईल.

संमेलनात २४ देश सहभागी होतील आणि ४०० हून अधिक प्रकल्पांचे प्रदर्शन सादर होईल.  जेएनपीटीचे अध्यक्ष  संजय सेठी हे पहिल्या सत्राचे - ‘जागतिक दर्जाच्या बंदरांचा विकास’ - संयोजक असतील. उपाध्यक्ष उन्मेष  वाघ, भा.रा.से. हे ‘महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी’ या विषयावरील विशेष सत्राचे संयोजक असतील. 

जेएनपीटी संपूर्ण जगभरात बंदर उद्योगासाठी दर्जेदार सेवेचा बेंचमार्क स्थापित करण्यासाठी समर्पित असून निरंतर व्यापार वाढीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या उद्देशाने बंदरातील कार्यक्षमता व वाहतूक हाताळणी क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी नियोजनबद्धरीत्या गुंतवणूक केली आहे. ‘मेरिटाइम इंडिया समिट’मध्ये जेएनपीटीने विविध कंपन्यांसमवेत ३० सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामुळे जेएनपीटीला देशातील गुंतवणुकीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून स्थापित करण्यास मदत होणार आहे. जगभरात कोविड १९ चा परिणाम झाल्यानंतरही जेएनपीटीमध्ये २७ हजार कोटींची नवीन गुंतवणूक झाली आहे. यामुळे रोजगाराच्या विपुल संधी निर्माण होतील.- संजय सेठी, अध्यक्ष, जेएनपीटी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई