शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

एसआरपीएफ भरतीदरम्यान जळगावच्या उमेदवाराचा मृत्यू, धुळ्याचा गंभीर

By नारायण जाधव | Updated: June 29, 2024 19:49 IST

पाच जण आजारी : डायघर पोलिसांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर असलेल्या एसआरपीएफ ग्रुप ११ च्या कॅम्प परिसरात भरती प्रक्रियेदरम्यान धावण्याची चाचणी सुरू असताना, काही उमेदवार जवानांना शरीरात अकड आणि उलट्यांचा त्रास झाल्याने त्यांना तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असता, यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अक्षय बिऱ्हाडे या एका उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. यात धुळे येथील एका उमेदवाराची प्रकृती गंभीर असल्याने त्यास व्हेंटिलेटरवर ठेवले असून, चार जणांना आयसीसीयूमध्ये ठेवले आहे, तर एकास घरी सोडले आहे.

ठाण्यातील शीळफाटा परिसरात एसआरपीएफ भरती सुरू आहे. राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने इच्छुक तरुण येथे आले आहेत. शनिवारी सकाळी भरतीप्रक्रियेतील धावण्याची चाचणी सुरू असताना, काही जणांनी चक्कर येणे, उलट्या होणे, अंगात अकड येणे अशा तक्रारी केल्या. यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी काही उमेदवारांना सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास कळवा, ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच अक्षय बिऱ्हाडे यास रक्ताची उलटी झाली. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ. राकेश बारोट यांनी सांगितले.

अक्षय बिराडे हा जळगावातील अमळनेर येथील रहिवासी होता. डॉ. बारोट यांनी सांगितले की, अक्षयचे शरीर ताठ झाले होते आणि त्याला उलट्या होत होत्या. त्याला न्यूमोनियाचीही तक्रार होती, तर धुळे येथील प्रेम ठाकरे (२९) याची प्रकृती गंभीर आहे. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. याशिवाय पवन शिवाजी शिंदे (२५), अभिषेक शेटे (२४), सुमित किशोर आडतकर (२३), साहिल किशोर लवण (१९) या चार जवानांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे, तर अमित गायकवाड नावाच्या जवानाला उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच अक्षय बिऱ्हाडेच्या मृत्यूचे नेमके कारण समजेल, असे डॉ. बारोट यांनी सांगितले.

सकाळी भरतीदरम्यान उमेदवारांना पाच मिनिटांत ५०० मीटर धावण्याची शर्यत पूर्ण करायची असते. अशावेळी अनेक उमेदवार शेवटच्या क्षणी जीव तोडून धावतात, त्यावेळी हा प्रकार घडला. यामुळे एकूण नऊ उमेदवारांना स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने कळवा रुग्णालयात दाखल केले. तेथे अक्षय बिऱ्हाडे या उमेदवाराने आपल्या भावाशी बोलताना आपण बरे आहोत, असे सांगितले होते. मात्र, अचानक त्यास रक्ताची उलटी झाल्याने त्याचा मृत्यू झाला, असे डायघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिंदे यांनी सांगितले. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.