शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
6
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
7
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
8
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
9
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
10
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
11
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
12
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
13
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
14
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
15
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
16
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
17
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
18
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
19
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
20
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार

जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:50 IST

जिल्हा परिषदेच्या शाळा शासनाच्या वतीने डिजिटल शाळा व हायटेक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

वैभव गायकर ।पनवेल : जिल्हा परिषदेच्या शाळा शासनाच्या वतीने डिजिटल शाळा व हायटेक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र पनवेलसारख्या स्मार्ट सिटी म्हणून उदयास येणाºया क्षेत्रात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस आल्याने अनेक विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.पनवेल महानगर पालिकेत तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. जवळजवळ २९ महसुली गावे पालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर याठिकाणी ५१ जिल्हा परिषदेच्या शाळा पालिकेच्या अंतर्गत येत आहेत. मात्र या शाळांची सद्यस्थिती पाहता कोणत्याही क्षणी याठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत आहेत. त्यामुळे पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.पालिकेत समाविष्ट जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ५१ शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये २५० शिक्षक असून जवळजवळ ५००० पेक्षा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र अनेक शाळा मोडकळीस आलेल्या असून त्यांच्या डागडुजीची अवस्था आहे. संबंधित शाळा जिल्हा परिषदेमधून पालिकेकडे वर्ग झाल्यानंतर जिल्हा परिषदेने शाळांना निधी देणे बंद केले आहे. विशेष म्हणजे अनेक शाळांना वीज बिल भरण्यासाठी देखील पैसे नसल्याचे उघड झाले आहे.पावसाळ्यात अनेक शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये गळती लागली आहे. शाळांच्या भिंती, छत जीर्ण झाल्याने कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या भीती व्यक्त होत आहे. नुकतेच धरणा कॅम्प येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे छप्पर मुसळधार पावसाने उडाल्याचा प्रकार घडला. पहिली ते चौथीपर्यंतची शाळा याठिकाणी भरते. एका खासगी कंपनीने दिलेल्या निधीमुळे या शाळेतील एक वर्ग सुरु आहे. छत उडणे, भिंतीला ओल येणे आदी प्रकार वारंवार घडत असल्याने विद्यार्थी शाळेत बसण्यास घाबरतात.खारघरमधील मुर्बी, बेलपाडा, धामोळे आदिवासी शाळेमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. यापैकी बेलपाडा गावातील शाळा जमिनीच्या वादातून बंद पडली आहे. एका भाड्याच्या खोलीत ही शाळा भरत होती. मात्र तत्कालीन खारघर ग्रामपंचायतीच्या वतीने भाडे मिळाले नसल्याने ती शाळा देखील बंद पडली आहे.सध्याच्या घडीला जिल्हा परिषदेच्या शाळा पालिकेत हस्तांतरणाचा विषय गाजत आहे. मात्र या प्रकाराची काहीही कल्पना नसलेल्या चिमुरड्यांना मात्र आपले जीव धोक्यात घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका नेत्रा किरण पाटील व हरेश केणी यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. या विषयावर पालिकेत चर्चा देखील झाली. मात्र पालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या उत्तरामुळे समाधान झाले नसल्याची खंत नगरसेवक हरेश केणी यांनी व्यक्त केली.महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पनवेल नगरपरिषदेच्या शाळांचे कामकाज सुधारण्यासाठी पालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी प्रयत्न केले.शाळेवर शिपाई नेमणे, विद्यार्थ्यांना सकस आहार पुरविणे तसेच शाळेच्या स्वच्छतेचा प्रश्न सोडविण्यास आयुक्तांनी पुढाकार घेतला. त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या शाळांचा विषय सोडविण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. शाळा हस्तांतरणाबरोबरच शेकडो शिक्षकांना देखील पालिकेत समाविष्ट करून घेण्याचा जिल्हा परिषदेचा अट्टाहास आहे. मात्र सध्याच्या घडीला या शाळांपैकी अनेक शिक्षक निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्याचा परिणाम पालिकेच्या तिजोरीवर पडण्याची शक्यता आहे.