शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल अरेस्ट करून लुटणारी आंतरराष्ट्रीय टोळी पोलिसांकडून गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 06:48 IST

देशात ७३ गुन्हे : बनावट कंपन्याद्वारे बँक खाते वापर

नवी मुंबई : खोट्या गुन्ह्यात कारवाईची भीती दाखवून डिजिटल अरेस्ट करून लुटणाऱ्या टोळीच्या तिघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे बनावट कंपन्यांच्या नावे उघडलेल्या बँक खात्यांचे पासबुक, डेबिट कार्ड मिळाले आहेत. एका प्रोफेसर महिलेची १ कोटी ८२ लाख रूपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी या टोळीचा भंडाफोड केला आहे. त्यांच्याविरोधात देशभरात ७३ गुन्हे दाखल असल्याचे यावेळी समोर आले आहे.

एका प्रोफेसर महिलेची सायबर भामट्यांनी आयकर विभागाच्या कारवाईच्या नावाने १ कोटी ८२ लाख ७२ हजारांची फसवणूक केली होती. या महिलेने साडेआठ लाखांचा कर चुकवल्याने त्यांच्यावर विभागाकडून कारवाई होणार असल्याचे त्यांना फोनवरून धमकावले होते. यासाठी त्यांना ईडी, सीबीआय अशा अनेक शासकीय संस्थांचे कारवाईचे बनावट आदेश पाठवले होते. चौकशीसाठी त्यांच्या बँक खात्यातली सर्व रक्कम संबंधितांनी गुन्ह्यात वापरलेल्या खात्यात वर्ग करून घेतली होती. फेब्रुवारीमध्ये याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यावरून उपायुक्त अमित काळे, सहायक आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे, सहायक निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, सचिन कोकरे, मंगेश वाट. नितीन जगताप. अनिल यादव आदींचे पथक केले होते. या तपासानंतर आणखी काही प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता आता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

सीमकार्ड पाठवले परदेशात 

याप्रकरणी गुन्ह्यात वापरलेले बँक खाते व इतर तांत्रिक तपासातून तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. रमेश शेट (४५), अमित शहा (४२) व राजकुमार नारंग (५५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामधील शेट व शहा हे दोघे जण मुंबईचे राहणारे असून, नारंग गुजरातचा रहिवाशी आहे. त्यांनी भाड्याच्या जागेवर बनावट कंपनी असल्याचे भासवून या कंपनीचे बँकेत खाते उघडले होते. आणि तेथे पैसे ट्रान्सफर केले जात होते.

या आरोपींनी दुसऱ्या व्यक्तींच्या २ नावे घेतलेले सीमकार्ड देशाबाहेरील टोळीतील सदस्यांना पाठविले होते. त्याद्वारे देशाबाहेरील सदस्यांकडून येथील नागरिकांना व्हिडिओ कॉल करून स्वतःला सीबीआय, पोलिस किंवा आयकर अधिकारी सांगून चौकशीच्या नावाखाली बँकेतली रक्कम ट्रान्सफर करून घ्यायचे, असे चौकशीत समोर आले आहे.

अटकेनंतर या टोळीकडून ३ लॅपटॉप, १८ चेकबुक, ३३ बँकांचे चेक, १८ मोबाइल, ३२ डेबिट कार्ड, २७सीमकार्ड, १० बनावट कंपन्यांचे स्टॅम्प व १० कंपन्यांच्या नावे ३६ खाती उघडण्यासाठीची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. या तिन्ही आरोपींवर यापूर्वीही अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून नवी मुंबईतले दोन गुन्हे उघड झाले आहेत. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमNavi Mumbaiनवी मुंबई