शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

अंतर्गत रस्त्यावरील पार्किंगचा ताप; वाहतूककोंडीची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 00:00 IST

अवजड वाहनांचाही शिरकाव, अपघाताची शक्यता

नवी मुंबई : शहरात सध्या पार्किंगचा मुद्दा गंभीर बनला आहे. वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जात आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या अरुंद आणि निमुळत्या रस्त्यावर ट्रक, डम्पर तसेच ट्रेलरसारखी अवजड वाहनेही पार्क केली जात असल्याने त्याचा ताप सर्वसामान्य रहिवाशांना सहन करावा लागत आहे.

नवी मुंबईतील पार्किंगचे नियोजन फसले आहे. यातच मागील काही वर्षांत शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. उद्योगधंदे वाढीस लागले आहेत, त्यामुळे वाहनांची संख्यासुद्धा वाढली आहे. त्या तुलनेत पार्किंगची सुविधा नसल्याने वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. जागा मिळेल तेथे मानमानी पद्धतीने वाहने उभी केली जात आहेत. प्रमुख रस्त्यांच्या कडेला दुतर्फा अशाप्रकारची बेकायदा पार्किंग दिसून येते.

प्रमुख रस्ते, पदपथ तसेच शहरातील सार्वजनिक जागा अपुऱ्या पडू लागल्याने आता वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यांवरही बेकायदेशीरपणे वाहने पार्क केली जातात. त्याचा फटका परिसरातील दळणवळण यंत्रणेला बसत आहे. निवासाच्या ठिकाणी किंवा इमारतीत पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने अंतर्गत रस्त्यावर रहिवासी आपली वाहने उभी करतात; परंतु आता त्यात अवजड वाहनांचीही भर पडू लागली आहे.

कोपरखैरणे परिसरातील बहुतांशी वसाहतीअंतर्गतच्या रस्त्यावर हे चित्र पाहावयास मिळते. विशेषत: कोपरखैरणेच्या खाडीकिनाºयालगतचा रस्ता, सेक्टर १९, सेक्टर १२ आदी परिसरातील रस्त्यावर सिलिंडरचे ट्रक, रसायनाने भरलेले टँकर आदी धोकादायक वाहने बेमालूमपणे पार्क केली जातात. मागील काही महिन्यांपासून अशा बेकायदा पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.महापालिकेची मोहीम ठप्परस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने दैनंदिन साफसफाई करणाºया सफाई कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. वाहनांचा अडथळा येत असल्याने रस्त्यांची योग्य पद्धतीने सफाई करता येत नाही. त्याचा ठपका संबंधित कर्मचाºयांवर ठेवला जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मध्यंतरी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला होता; परंतु महापालिकेची ही मोहीमही ठप्प पडली आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका