शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

अत्यावश्यक सेवेकऱ्यांना बाधा झाल्यानं पनवेलकरांची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 00:37 IST

डॉक्टर, परिचारिका, पोलीस, पत्रकार, मेडिकलचालक, दुकानदार, सीआयएसएफचे जवान, सफाई कर्मचारी आदीना कोरोनाची लागण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

वैभव गायकरपनवेल : पनवेल परिसरात कोविड-१९ च्या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून यात अत्यावश्यक सेवेतील घटकांचा सर्वाधिक समावेश आहे. डॉक्टर, परिचारिका, पोलीस, पत्रकार, मेडिकलचालक, दुकानदार, सीआयएसएफचे जवान, सफाई कर्मचारी आदीना कोरोनाची लागण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. यातील बहुतांश व्यक्ती या मुंबईत विविध क्षेत्रात कार्यरत असल्याने पनवेलकरांची चिंता वाढली आहे.गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात नव्याने कोविडचे संसर्ग होणारे रुग्ण कमी आहेत. मात्र, मुंबईस्थित विविध ठिकाणी कार्यरत असलेले नागरिक कोरोनाचे शिकार बनत आहेत. रविवारच्या आकडेवारीनुसार, पनवेल महापालिका हद्दीत ५२ तर पनवेल ग्रामीण भागात ९ रुग्ण आढळले आहेत. यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.पनवेलमध्ये सध्याच्या घडीला उपजिल्हा रुग्णालय (कोविड-१९ रुग्णालय) पनवेल, एमजीएम रुग्णालय कामोठे तसेच नवी मुंबईमधील खासगी रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, नव्याने वाढणारे रुग्ण मुंबईमधून संसर्ग होऊन पनवेलमध्ये वास्तव्यास असणारे आहेत.बहुतांश व्यक्ती अत्यावश्यक सेवेतील असल्याने पालिका प्रशासन याबाबत काहीच निर्णय घेऊ शकत नाही.पनवेल महापालिकेने खारघर शहरातील सेक्टर १५ मधील घरकूल सोसायटी, पनवेल शहरातील तक्का गाव, कळंबोलीमध्ये सीआयएसएफचे संकुल कोरोनाबाधित क्षेत्र घोषित केले आहे. या व्यतिरिक्त पनवेल ग्रामीणमधील विचुंबे, भिंगारवाडी आदी कोरोनाबाधित क्षेत्र घोषित केले आहे. येथील नागरिकांना परिसराबाहेर फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे.।कोरोना योद्धांना शहीद घोषित करण्याची मागणीउरण : कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या लढ्यात अहोरात्र झटणाºया शासकीय अधिकारी, पोलीस, डॉक्टर, नर्स, पत्रकार आणि सफाई कामगार यांच्यासह अन्य शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना संसर्गाची बाधा होऊन मृत्यू झाल्यास त्यांना शहीद म्हणून घोषित करावे, अशी मागणी उरण शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. याबाबतचे निवेदनही उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना देण्यात आले आहे. कोरोनासारख्या संसर्गजन्य विषाणूशी लढताना कोरोना योद्धांना जीव गमावण्याची परिस्थिती ओढावल्यास त्यांचे कुटुंब उघड्यावर येऊ शकते, अशा योद्धांना शासकीय मदतीसह शासनाने शहीद म्हणून घोषित करावे, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे. या प्रसंगी उरणच्या माजी नगरसेविका अफशा मुकरी व माजी नगरसेवक बबन कांबळे उपस्थित होते.>पनवेल परिसरात कोरोनाचा संसर्ग थांबविण्यास प्रशासनाला यश आले आहे. सध्याच्या घडीला नव्याने वाढणारे बहुतांश कोरोनाबाधित रुग्ण मुंबईमध्ये कार्यरत असलेले नागरिक आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील घटकांचा सहभाग मोठा आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील घटकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.- गणेश देशमुख, आयुक्त,पनवेल महानगरपालिका

--------------------पनवेल परिसरातून मुंबईत कामासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. रविवारी पनवेल परिसरात तीन नव्या रुग्णांची नोंद झाली. या तीन रुग्णांमध्ये एक परिचारिका, दुसरा बेस्ट वाहनचालक व तिसरा मुंबईमधील एका कंपनीत सीए म्हणून कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे, अशा वेळी पनवेल परिसरात मुंबईतून संसर्गाचा धोका वाढत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या