शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आयुक्तांनी केली स्वच्छतेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:19 IST

महानगरपालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी स्वच्छतेविषयक विविध मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत विद्यार्थी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती, नागरिकांच्या सहभागाने परिसराची स्वच्छता असे उपक्रम राबविले जात आहे.

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी स्वच्छतेविषयक विविध मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत विद्यार्थी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती, नागरिकांच्या सहभागाने परिसराची स्वच्छता असे उपक्रम राबविले जात आहे. शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून तेथील नागरिकांशी चर्चा केली.वाशी आणि सी.बी.डी. बेलापूर रेल्वे स्टेशन आणि परिसरातील स्वच्छतेची महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने मौलिक सूचना दिल्या तसेच वाशी येथील महापालिका सार्वजनिक रुग्णालयास अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची व रुग्णसेवा सुविधांची पाहणी केली. तुर्भे विभागाची पाहणी करताना आयुक्तांनी हनुमाननगर येथील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची पाहणी केली व तेथील आवश्यक दुरुस्ती, साफसफाई, परिसर सुधारणा याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

वाशी रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरणया पाहणी दौºयात आयुक्तांनी वाशी रेल्वे स्टेशनला भेट दिली व त्यावरील इन्फोटेक पार्कमधील साफसफाई करणारी संस्था व्हीआरएससीसीएल यांचेशी चर्चा करून त्यांना नियमित स्वच्छतेविषयी व कचºयाच्या ओला व सुका वर्गीकरणाविषयी सूचना केल्या. स्टेशनवर ठरावीक अंतरावर ओला व सुका कचºयासाठी लहान आकाराच्या स्वतंत्र कचराकुंड्या लावणेबाबत रेल्वे प्रशासनालाही यावेळी सूचना देण्यात आल्या. वाशी रेल्वे स्टेशनबाहेरील ५०० मीटरपर्यंतच्या परिसराची साफसफाई तसेच सुशोभीकरण करणेबाबत निर्देशित केले.

स्वच्छतागृहांची पाहणीरेल्वे स्टेशनमध्ये जाण्या-येण्यासाठी रघुलीला मॉलकडील बाजूने असलेली दोन्ही प्रवेशव्दारे बंद करण्याच्याही सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या. रघुलीला मॉलसमोरील मोकळ्या जागेत कचरा टाकला जातो व संपूर्ण परिसर अस्वच्छ दिसतो याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत त्याठिकाणी कचरा टाकला जाऊ नये याकरिता तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देत तेथे फलक लावण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. स्टेशनमधील शौचालयांचीही पाहणी केली व त्याठिकाणी नियमित स्वच्छता राहील याकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित केले. वाशी बसडेपो येथील शी टॉयलेट तसेच इतर ठिकाणची ई-टॉयलेट नियमित कार्यान्वित राहण्यासाठी आवश्यक गोष्टींची त्वरित पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई