शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

वाळवीग्रस्त गावाच्या पुनर्वसन जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 02:56 IST

५०० हून अधिक बैठका : जसखारमध्ये जागा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली

उरण : वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनासाठी उरण तालुक्यातील जसखार महसूल हद्दीतील जागा उपलब्ध करून देण्याबाबत हालचाली शासनाने सुरू केल्या आहेत. उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी जेएनपीटी अधिकाºयांसह सोमवारी पुनर्वसन होणाºया जागेची पाहणी केली.

वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाचे शासकीय नियम व मानकानुसार पुनर्वसन करण्यात आलेले नाही. उरण शहरातील बोरी-पाखाडी महसूल हद्दीत जेएनपीटीने हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन केले आहे. मात्र, अपुºया जागेत झालेल्या पुनर्वसित सर्वच घरांना वाळवीने पोखरले आहे. आवश्यकतेनुसार १७ हेक्टर जागा आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून त्याठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी सातत्याने वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी लावून धरली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून जेएनपीटी, राज्य, केंद्र सरकारपर्यंत पुनर्वसनासाठी ग्रामस्थांनी गेल्या ३२ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. इतक्या वर्षात जवळपास ५०० हून अधिक बैठका झाल्या आहेत. मात्र, वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा न्याय आणि पुनर्वसनापासून अद्यापही वंचित आहे. वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या अन्यायाबाबत वृत्तपत्रांनी आवाज उठवल्यावर शासनाने गावाच्या पुनर्वसनासाठी नव्याने उरणमधील जसखार महसूल हद्दीतील जागा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनासाठी आवश्यक जागेची सोमवारी उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी करण्यात आली. या वेळी जेएनपीटीअधिकारी राजेश म्हात्रे, उरण तहसीलदार कविता गोडे, हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ, मंडळ अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते. पाहणीचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले आणि जेएनपीटी अधिकारी राजेश म्हात्रे यांनी दिली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई