शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकाच्या आवारात फेरीवाल्यांचा शिरकाव, प्रवासी-नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 05:10 IST

शहरातील पदपथ आणि रस्ते व्यापणाऱ्या फेरीवाल्यांनी आता चक्क रेल्वेस्थानकांच्या आवारात शिरकाव केला आहे.

नवी मुंबई : शहरातील पदपथ आणि रस्ते व्यापणाऱ्या फेरीवाल्यांनी आता चक्क रेल्वेस्थानकांच्या आवारात शिरकाव केला आहे. फेरीवाल्यांकडून स्थानकाच्या आतील भागात बसलेल्या बस्तानामुळे स्थानकाला मंडईचे रूप आले आहे. रेल्वेस्थानकात ये-जा करताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत असून, प्रवासी त्रस्त झाले आहेत. या प्रकाराकडे सिडकोचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.नवी मुंबई शहर वसविताना सिडकोने रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भविष्यात वाढणाºया नागरिकांच्या गर्दीचा विचार करता सर्व सोई-सुविधांयुक्त रेल्वे स्थानके सिडकोने बांधली आहेत. शहरातील पदपथांवर आणि रस्त्यांवर मांडलेले बस्तान यामुळे नागरिकांना पदपथांवरून चालणे जिकिरीचे झाले आहे. त्यातच आता फेरीवाल्यांनी रेल्वेस्थानकांच्या आवारातदेखील शिरकाव करायला सुरुवात केली आहे. नेरुळ रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारावर त्यानंतर थेट स्थानकाच्या आतदेखील फेरीवाल्यांनी व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. नेरुळ रेल्वेस्थानकातून रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने संध्याकाळी फेरीवाल्यांमुळे नागरिकांना रेल्वेस्थानकात ये-जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्थानकात बेकायदा फेरीवाल्यांची संख्या वाढल्याने रेल्वेस्थानकाला मंडईचे रूप आले आहे. स्थानकांच्या रक्षणासाठी सिडकोने सुरक्षारक्षक नेमले आहेत; परंतु सुरक्षारक्षकांना न जुमानता फेरीवाले बिनदिक्कतपणे व्यवसाय करीत आहेत. फेरीवाल्यांमुळे सुरक्षेचा मुद्दादेखील ऐरणीवर आला असून सिडको प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे प्रवासी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.नेरु ळ रेल्वेस्थानकाच्या आवारात फेरीवाले मोठ्या प्रमाणावर वाढले असून, रेल्वे स्थानक आहे की मंडई, असा प्रश्न पडतो. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून सुरक्षेचा मुद्दादेखील निर्माण झाला आहे. सिडकोने या फेरीवाल्यांवर कारवाया करून यावर नियंत्रण मिळवावे.- धनंजय खंडागळे, नागरिक

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई