शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरचे रहिवासी मृत्यूच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 04:10 IST

दुर्घटनेची शक्यता; घरांवर विद्युत वाहिन्यांचे जाळे

नवी मुंबई : तुर्भेतील इंदिरानगर परिसरातील रहिवासी उपरी विद्युत वाहिन्यांखाली जीव मुठीत घेऊन राहत आहेत. जागोजागी विद्युत वाहिन्यांचे जाळे तयार झाले असून, त्याचा शॉक लागून अनेकांचे प्राणदेखील गेले आहेत. भविष्यात त्या ठिकाणी एखाद्या छोट्याशा आगीमुळे देखील अग्नितांडव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तुर्भे एमआयडीसी परिसराला लागूनच इंदिरानगर वसाहत निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीला शेकडोच्या वर कुटुंबे त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत. त्यापैकी अनेकांनी बैठ्या चाळीतील घरांची पुनर्बांधणी करून एक किंवा दोन मजल्यांची घरे बांधली आहेत. मात्र, वाढत्या बांधकामांमुळे रहिवाशांचेही जीव धोक्यात आले आहेत. जागोजागी असणाऱ्या विजेच्या खांबाला लागूनच बहुतांश घरे आहेत. काही ठिकाणी घरांच्या खिडक्या, दरवाजे यापासून हाताच्या अंतरावर एकत्रित विद्युत वायरची जोडणी झालेली आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीचा अथवा मुलाचा नकळतपणे वायरला स्पर्श झाल्यास त्याचे प्राणदेखील जाऊ शकतात. अनेकदा पावसात विजेच्या खांबामधूनही विजेचा प्रवाह होतो. अशा वेळी तिथे खेळणाºया मुलांचा त्या खांबाला स्पर्श होऊन शॉक लागण्याचे अथवा काही कारणाने उपरी वायर तुटून अंगावर अथवा घरावर पडण्याचे प्रकार घडत आहेत. अशातच परिसरात एखादी छोटीशी लागलेली आगदेखील संपूर्ण इंदिरानगर परिसरात अग्नितांडव पसरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छतांवर मोठ्या प्रमाणात पसरलेले प्लॅस्टिक त्यासाठी कारणीभूत ठरू शकते.पावसाळ्यात घरामध्ये पाणी ठिपकू नये, याकरिता अनेक जण घरांवर प्लॅस्टिक पसरवून टाकतात. या कामा वेळी उपरी विद्युत वाहिनीला नकळत स्पर्श होऊन शॉक लागण्याच्या घटना घडत आहेत. अशा प्रकारांमुळे प्रतिवर्षी दोन ते तीन व्यक्तींचे प्राण जात आहेत. यामुळे संपूर्ण परिसरावर पसरलेले विद्युत वाहिन्यांचे जाळे हटवून उपरी वायर भूमिगत करण्याची मागणीदेखील अनेकांनी केलेली आहे. मात्र, संबंधित प्रशासनाकडून त्याचे फारसे गांभीर्य घेतले जात नसल्याने रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.इंदिरानगरमधील उपरी विद्युत वायरचा शॉक लागून मृत्यूच्या घटना घडत आहेत. यामुळे तिथल्या वायर भूमिगत करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासंदर्भात खासदार राजन विचारे यांनी वीज वितरणच्या अधिकाºयांना देखील लेखी कळवलेले आहे. त्यानंतरही ठोस पर्याय राबवला जात नसल्याने भविष्यात त्या ठिकाणी मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.- महेश कोटीवाले,विभागप्रमुख, शिवसेना

टॅग्स :electricityवीजNavi Mumbaiनवी मुंबई