शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

उद्घोषणा होत नसल्याने संतापात भर; हार्बरवर सिग्नल यंत्रणेत बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 07:21 IST

ऑफिस गाठण्यासाठी करावी लागली कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून पहाटेपासून लोकल उशिराने धावत असल्याच्या  तक्रारी असताना गुरुवारी हार्बर मार्गावरही जुईनगर रेल्वेस्थानकांत सिग्नल बिघाडामुळे ट्रान्स हार्बर आणि  हार्बर  मार्गावरील रेल्वेप्रवाशांचे प्रचंड हाल झाले. लोकल का उशिराने धावत आहेत, का खोळंबल्या आहेत,  याचे उत्तर उशिरापर्यंत न मिळाल्याने प्रवाशांच्या संतापात अधिकच भर पडली.

ट्रान्स हार्बरलाही फटकाजुईनगर रेल्वेस्थानकाजवळ गुरुवारी सकाळी सिग्नल यंत्रणेत अचानक बिघाड झाला. परिणामी सीएसएमटीहून  पनवेल-नवी मुंबईकडे ये-जा करणाऱ्या लोकलसह ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी-पनवेल लोकलसेवाही  विस्कळीत झाली. यामुळे दोन्ही मार्गांवर ये-जा करणारे चाकरमानी, विद्यार्थी यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. अनेकांना लेटमार्कला सामोरे जावे लागले.

पनवेल लोकल चारदा खोळंबलीगुरुवारी सकाळी ठाण्याहून पनवेलकडे जाणारी एक लोकल एक नव्हे, दोन नव्हे तर चार वेळा चार ठिकाणी खोळंबली. हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून रोज सकाळी पनवेल लोकललाच होत असल्याचे दैनंदिन प्रवास करणाऱ्या एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याने सांगितले. लोकलमध्ये उद्घोषणेची सोय नसल्याने लोकल खोळंबा का हाेत आहे, हे कळत नाही. यामुळे मात्र कॉलेजमध्ये जायला रोज उशीर हाेत असल्याचे या विद्यार्थ्याने सांगितले. सध्या परीक्षा सुरू असल्याने टेन्शन वाढत असल्याचे तो म्हणाला.

लोकलमध्ये चढण्यासाठी झुंबडसिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील सर्वच स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. यामुळे वृद्धांसह लहान मुलांचे हाल झाले. वाहतूक सुरू झाल्यानंतरही लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाल्याने अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागले.

टॅग्स :Harbour Railwayहार्बर रेल्वे