शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

भारतातील पहिलाच प्रोटोन बीम उत्पादन प्रकल्प पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 03:29 IST

सध्याच्या घडीला ट्रीटमेंट रूमचे काम सुरू आहे.

वैभव गायकर पनवेल : देशात कर्क रोगावर आधुनिक पद्धतीची उच्च तंत्रज्ञानाची प्रोटोन थेरपी लवकरच खारघरमधील टाटा एक्ट्रेक सेंटरमध्ये सुरू होणार आहे. भारतात प्रथमच अशा प्रकारची आधुनिक उपचार पद्धती वापरली जाणार असल्याने, दरवर्षी हजारो कर्करुग्णांना या थेरेपीद्वारे जीवनदान मिळणार आहे. भारत सरकारच्या परमाणू ऊर्जा विभागाच्या मदतीने ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. बेल्जियम स्थित आयबीए कंपनीमार्फत संबंधित यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण वेगात सुरू असून, दोन टप्पे पूर्ण झाले. संबंधित यंत्रणा लवकरच कार्यान्वित होणार आहे. सध्याच्या घडीला ट्रीटमेंट रूमचे काम सुरू आहे.२९ जानेवारी रोजी संबंधित यंत्रणा टाटा एक्ट्रेक सेंटर येथे आणण्यात आली. यानंतर ३१ जुलै रोजी दुसऱ्या टप्प्यात संबंधित यंत्रणा पूर्णपणे बसविण्यात आली आहे. सुमारे ६५ हजार स्क्वेअर फूट या जागेवर प्रोटोन थेरेपीची स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे. या ठिकाणी प्रोटोन थेरपी यंत्रणा, तसेच तीन ट्रीटमेंट रूम असणार आहेत. या व्यतिरिक्त या इमारतीमध्ये डॉक्टर्स रूम, लहान मुलांसाठी वेटिंग रूम्स, सिटी स्कॅन रूम आदींचा समावेश आहे. पेन्सिल बीम स्कॅनिंग ही या प्रोटोन थेरेपीची विशेषत: आहे. सुमारे २० ते ४५ दिवसांत अवघ्या १५ मिनिटांत रुग्णावर ही थेरेपी वापरली जाणार आहे. प्रोटोन थेरेपी ही कर्करुग्णांना दिली जाणारी सर्वात महागडी अशी उपचार पद्धती आहे. कर्करुग्णांच्या पेशींना नष्ट करण्यासाठी रेडिएशन दिले जाते. परंपरागत चालत आलेल्या रेडिएशनच्या उपचार पद्धतीत कर्करुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रोगी पेशींसह निरोगी पेशीही यामुळे मृत पावत असल्याने, कर्क रुग्णांवर घातक परिणाम होतो. यावेळी अनेक रुग्णांचे केसदेखील गळत असतात. मात्र, नव्याने अवगत झालेल्या प्रोटोन थेरपीमुळे रुग्णांना होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. बेल्जियम देशातील आयबीए कंपनीने ही यंत्रणा विकसित केली आहे.वर्षभरात सुमारे ८०० ते ९०० कर्क रुग्णावर या थेरेपीद्वारे उपचार केले जाणार आहेत. याकरिता संबंधित यंत्रणा कार्यान्वित करण्याची जबाबदारी एक्ट्रेक टीएमसीच्या डॉक्टर, अभियंते आणि आयबीएच्या तंत्रज्ञांवर असणार आहे. टीएमसीचे संचालक डॉ.राजेंद्र बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक डॉ.सिद्धार्थ लस्कर, टाटा एक्ट्रेकचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता व आयबीएचे संचालक राकेश पाठक आदी मेहनत घेत आहेत.>जगभरातील महागडी उपचार पद्धतीअमेरिकेत याच थेरपीसाठी किमान ७० लाख रुपये मोजावे लागतात. भारत सरकारच्या परमाणू ऊर्जा विभागाच्या मदतीने ही यंत्रणा खारघर टाटा रुग्णालयात उभारण्यात येत आहे. वर्षभरात उपचार करण्यात येणाºया ९०० रुग्णांपैकी ६० टक्के रुग्णांवर या ठिकाणी मोफत उपचार केले जाणार आहेत. गरीब व गरजूंना या ६० टक्क्यांमध्ये प्राधान्य असणार आहे. पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत प्रोटोन थेरेपी या ठिकाणी सुरू होणार आहे, अशी माहिती डॉ.सिद्धार्थ लस्कर यांनी दिली.