शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ भूखंड टाऊनशिपला देण्यास वाढता विरोध, राजकीय पक्षांची प्रस्ताव रद्दची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 10:00 IST

शुक्रवारी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन त्यांना दिले.  

नवी मुंबई : ऐरोलीमधील ३० हेक्टर क्षेत्रफळाचा भूखंड बड्या उद्योगपतीला टाऊनशिपसाठी देण्याच्या हालचाली सिडकोत सुरू असून, या प्रस्तावाला सिडको संचालक मंडळानेही मंजुरी दिल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सर्व क्षेत्रात त्याचे पडसाद उमटले. सिडको युनियनसह आता भाजप, काँग्रेससह उद्धवसेनेने हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन त्यांना दिले.  

बड्या बिल्डर, उद्योजकांना कवडीमोल भावात भूखंड वाटले जात आहेत. प्रकल्पग्रस्तांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होत असल्याचे पक्षांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी उद्योगपतींच्या फायद्यासाठी केलेला हा व्यवहार रद्द करून प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडाचे वाटप करावे; अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत, नवी मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष संदेश बनसोडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव प्रणीत शेलार, जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष संतोष सुतार, आदी उपस्थित होते.

सिडको कार्यालयाबाहेर आंदोलन उद्धवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वात नवी मुंबई, पनवेलमधील पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी बेलापूर येथील सिडको कार्यालयाबाहेर आंदोलन केले.  विचारे यांनी शिष्टमंडळासह सिडको अधिकाऱ्यांची भेट घेतली. भाजपच्यावतीने नवी मुंबंई जिल्हा भाजपचे अध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांनी तर शेकापकडून माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सिडकोच्या निर्णयास विरोध केला आहे.

टॅग्स :cidcoसिडको