शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस ठाणी वाढवणार; गुन्हेगारीला बसणार आळा

By नारायण जाधव | Updated: August 30, 2023 20:15 IST

शहरी भागात दोन ते चार किमी तर ग्रामीण भागात चार ते दहा किमीच्या परिघात आता नवे पोलिस ठाणे असणार आहे.

नवी मुंबई : राज्यातील वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरणासह जीवनमान पद्धतीत झालेला बदल, त्यानुसार गुन्ह्यांचे बदलेले स्वरूप, सोशल मीडियाचा समाजात वाढलेला प्रसार आणि वापर, त्या माध्यमातून होणारे सामाजिक, धार्मिक गुन्हे, त्याचे समाजात उमटणारे पडसाद, इंटरनेटद्वारे होणारे आर्थिक फसवणुकीचे वाढते गुन्हे लक्षात घेऊन राज्याच्या गृह विभागाने पोलिस ठाण्यांच्या निर्मितीसाठी नवी नियमावली तयार केली आहे. यानुसार शहरी भागात दोन ते चार किमी तर ग्रामीण भागात चार ते दहा किमीच्या परिघात आता नवे पोलिस ठाणे असणार आहे. तसेच मोठी देवस्थाने, धार्मिक यात्रा भरणारी गावे, शहरे, सेझ येथेही नवे पोलिस ठाणे असेल, नव्या पोलिस ठाण्यांच्या निर्मितीमुळे गुन्हेगारीला अटकाव बसेल, असा विश्वास गृह विभागाने व्यक्त केला आहे. ही नवी नियमावली गेल्या आठवड्यात जाहीर केली आहे.

सध्या एखादा गुन्हा घडल्यास तक्रारीसाठी पीडितांना लांबवर धाव घ्यावी लागते. यात त्यांचा बराच वेळ, श्रम, पैसा वाया जातो. याशिवाय पोलिसांना तपासात अनेक अडचणी येतात. मात्र, आता घरापासून जवळच पोलिस ठाणे असल्यास तक्रारदारांना न्याय मिळणे आणि गुन्हेगारांना पकडणेही सोपे होणार आहे.

हे आहेत नव्या पोलिस ठाण्याचे निकष१ - लोकसंख्येची घनता विशेष भौगोलिक स्थान, पर्यटन स्थळ अशा ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाणे असावे.२ - शरीराविरुद्ध व संपत्तीविषयी पारंपरिक गुन्ह्यांचे प्रमाण जिथे जास्त आहे.३ - आर्थिक गुन्हे, बँकांची फसवणूक, चोऱ्या, दरोड्यांचे प्रमाण जिथे जास्त आहे.४ - ज्या ठिकाणी वाहनांची संख्या मोठी आहे, वारंवार वाहतूककोंडी होते, अपघात होतात, अशा ठिकाणी वाहतूक पोलिस चौकी असावी.५ - सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणी जसे शैक्षणिक संस्था, हॉस्टेल, न्यायालये, धार्मिक स्थळे, बसस्थानके, अणुऊर्जा प्रकल्प, ऊर्जा प्रकल्प, मोठी धरणे, खेळाचे मोठे स्टेडियम६ - सामाजिक स्तरावरील गुन्हे, जसे अनुसूचित जाती/अनु. जमाती/गतिमंद, दिव्यांग, महिला यांच्यावर ज्या ठिकाणी अत्याचाराचे प्रमाण जास्त आहे.७ - अमली पदार्थांचे सेवन, विक्री, लहान मुलांसाेबत होणारे गुन्हे८ - डायल ११२ वर ज्या ठिकाणावरून जास्त प्रमाणात मासिक काॅल येतात अशी ठिकाणे९ - सायबर गुन्ह्यांचे प्रमाण जिथे जास्त आहे.१० - मानवी तस्करीसह शरीरविक्रीचे व्यवसाय करणारी ठिकाणे

तीन वर्षांतील गुन्ह्यांची नोंद इतकी हवीभाग एक ते पाचमधील भादंविमधील गुन्ह्यांची सरासरी १५० पेक्षा असावी, तसेच भाग सहासह स्थानिक कायद्यांतील गुन्ह्यांची सरासरी २०० पेक्षा जास्त असावी. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस