शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

तिवरांच्या संख्येत वाढ

By admin | Updated: April 9, 2016 02:25 IST

मुरुड तालुक्याची लोकसंख्या ६५ हजाराच्या वर असून, २४ ग्रामपंचायती आहेत. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला साळाव ते नांदगाव तर दक्षिण बाजूस मुरुड ते सावली असा सागरीकिनारा लाभला आहे.

संजय करडे,  नांदगावमुरुड तालुक्याची लोकसंख्या ६५ हजाराच्या वर असून, २४ ग्रामपंचायती आहेत. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला साळाव ते नांदगाव तर दक्षिण बाजूस मुरुड ते सावली असा सागरीकिनारा लाभला आहे. तालुक्याचा बहुतांशी भाग समुद्रकिनाऱ्याला लागून असल्याने समुद्राच्या भरती रेषेचे पाणी असंख्य शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने ही शेतजमीन नापीक होत आहे. शेतजमीन खारट झाल्याने येथील शेतकऱ्यांनी शेती सोडून दिली, त्यामुळे अशा जमिनीत समुद्राचे पाणी शिरून कालांतराने तिवरांची संख्या वाढत आहे. यासाठी खार बंदिस्त बंधारे बांधण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. महसूल व वन मंत्रालयाने तिवरांच्या वृक्षांना विशेष संरक्षित केले आहे. तिवरांची झाडे तोडल्यास त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जातो, अशी माहिती परिमंडळ वन अधिकारी मुरुड विलास फंडे यांनी दिली. खारलँड विभागाकडून गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांनी मागणी करून सुद्धा खार बंदिस्त बंधारे निर्माण करता आलेले नाहीत. तसेच जे खार बंदिस्त बंधारे मोडकळीस आले अथवा नष्ट होत आहेत, त्याची दुरुस्ती सुद्धा करण्यात येत नसल्याने अमावस्या व पौर्णिमेच्या मोठ्या भरतीला या बंधाऱ्यावरून पाणी शेतात घुसून शेतजमीन नापीक होत आहे. यामुळे शेतकरी नाराज असून, खार बंदिस्त बंधारे बांधण्यात यावे अशी मागणी करीत आहेत. याबाबत अंबोली ग्रामपंचायतीचे सरपंच व शेतकरी मनोज कमाने म्हणाले, की अंबोली खारभूमीचा बंधारा नादुरुस्त झाला आहे तो त्वरित दुरुस्त व्हावा, अशी मागणी करणारे निवेदन आम्ही खार भूमी खात्याकडे एक वर्षापूर्वी दिले होते. परंतु या खात्याकडून कोणताच प्रतिसाद नाही. या बंधाऱ्यावरील समुद्राचे पाणी आत वा बाहेर जाण्यासाठी असणाऱ्या मोऱ्या खूप खराब व नादुरुस्त झाल्या होत्या. या विभागाचा कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने असंख्य शेतकरी एकवटून अखेर श्रमदानातून हे काम पूर्ण केले. ४० वर्षांपूर्वीचा हा बंधारा असून, पावसाळ्यापूर्वी जर हे काम पूर्ण झाले नाही तर समुद्राचे पाणी शेतात शिरून असंख्य एकर शेतजमीन नापीक होईल, अशी भीती कमाने यांनी व्यक्त केली. समुद्राचे पाणी शिरल्याने बहुतांशी शेतात आता तिवरांची संख्या वाढली आहे.वाढती लोकसंख्या व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतकऱ्यांची मुले वेगळा संसार थाटून वेगळे घर बांधू इच्छितात. परंतु त्यांच्या मालकीच्या जमिनीत तिवर वाढल्याने तिथे घर बांधताना खूप समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वन खाते व महसूल खाते आडकाठी आणून काम थांबवतो. यामुळे वाढती तिवरांची संख्या शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे.