शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नवी मुंबई महापालिकेत उपरेच बनले कारभारी, सर्व उपायुक्त शासनाचे; अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

By नामदेव मोरे | Updated: August 31, 2023 10:05 IST

आता एका उपायुक्ताला कायमस्वरूपी समायोजन म्हणून नियुक्ती दिल्यामुळे मनपामध्ये वर्षांनुवर्ष काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. 

नवी मुंबई : शासनाने प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा कारभार एकवटला आहे. दोन अतिरिक्त आयुक्त, दहा उपायुक्त, तीन सहायक आयुक्त, नगररचनाकार, मुख्य लेखा व वित्तअधिकारी, मुख्य लेखापरीक्षक व तीन सहायक आयुक्त या सर्वांना नगरविकास विभागाने प्रतिनियुक्तीवर महानगरपालिकेत नेमले आहे. आता एका उपायुक्ताला कायमस्वरूपी समायोजन म्हणून नियुक्ती दिल्यामुळे मनपामध्ये वर्षांनुवर्ष काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. 

ग्रामपंचायतीमधून थेट महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालेली नवी मुंबई ही एकमेव महानगरपालिका आहे. पहिल्या वर्षी ५० कोटीपेक्षा कमी अर्थसंकल्प असलेल्या नवी मुंबईने ३० वर्षांमध्ये ४९२५ कोटींचा अर्थसंकल्प तयार करण्यापर्यंत मजल मारली आहे.  प्रगतीचे हे टप्पे पार करण्यासाठी येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र परिश्रम केले. परंतु, मागील काही वर्षांमध्ये महापालिकेमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना वाढू लागली आहे. महानगरपालिकेमधील दोन अतिरिक्त आयुक्तांपैकी एक मनपाच्या सेवेतील असावा, दहापैकी पाच उपायुक्त मनपा सेवेतील असावे, विभाग अधिकारी मनपा सेवेतील असावेत, अशी अपेक्षा आहे. 

महानगरपालिकेतील प्रतिनियुक्तीवर अधिकारी व त्यांच्याकडील पदभारअधिकाऱ्याचे नाव              पदविजयकुमार म्हसाळ      अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले     अतिरिक्त आयुक्त शरद पवार     उपायुक्त प्रशासन दिलीप नेरकर     उपायुक्त उद्यानबाबासाहेब राजळे     उपायुक्त घनकचरा व्यवस्थापनमंगला माळवे     उपायुक्त भांडार श्रीराम पवार     उपायुक्त समाज विकास सोमनाथ पोटरे     उपायुक्त अतिक्रमण ललिता बाबर     उपायुक्त क्रीडा दत्तात्रेय घनवट     उपायुक्त शिक्षणयोगेश कडुसकर     परिवहन व्यवस्थापकडॉ. राहुल गेठे     उपायुक्त सोमनाथ केकाण     नगररचनाकारसत्यवान उबाळे     मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र इंगळे     मुख्य लेखापरीक्षक प्रबोधन मावडे     सहायक आयुक्त, नेरूळ मिताली संचेती     सहायक आयुक्त, वाशीसागर मोरे     सहायक आयुक्त, कोपरखैरणे

कर्मचारी युनियनचा न्यायालयात जाण्याचा इशारा    शहर अभियंता, महानगरपालिका सचिव व पाच सहायक आयुक्त एवढेच विभाग प्रमुख मूळ महानगरपालिकेमधील आहेत.     शासनाने नुकतीच डॉ. राहुल गेठे यांची उपायुक्तपदावर वर्णी लावली आहे. यापूर्वीची उपायुक्तांची नियुक्ती २ किंवा ३ वर्षांसाठी होती.     गेठे यांची नियुक्ती कायमस्वरूपी केल्यामुळे सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.     घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांना कायम करण्याच्या हालचाली सुरू असल्यामुळे महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांनीही विरोध  केला आहे.     इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनीही गेठे यांच्या नियुक्तीला न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा दिला आहे.     प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांचा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अनेक जण दुय्यम स्थानावरयापूर्वी एक अतिरिक्त आयुक्त, सर्व विभाग अधिकारी, उपायुक्त मनपाच्या सेवेतीलच होते. मागील पाच वर्षांत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढली. यामुळे पालिकेमध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांना दुय्यम पदावर समाधान मानावे लागते.

दहा उपायुक्तांचा समावेशसद्यस्थितीमध्ये महानगरपालिकेमधील दोन्हीही अतिरिक्त आयुक्तांसह सर्व दहा उपायुक्त शासनाचेच असून, तीन सहायक आयुक्त, नगररचनाकार, मुख्यलेखा व वित्त अधिकारी, मुख्य लेखापरीक्षकही प्रतिनियुक्तीवरील आहेत. 

महानगरपालिकेमध्ये नुकतीच उपायुक्तांची झालेली नियुक्ती नियमबाह्य आहे. येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.- रवींद्र सावंत, अध्यक्ष, इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियन

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका