शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्याच्या मध्यावर तुर्भेत पाणी टंचाई; शिवसेनेचा हांडा मोर्चा 

By नामदेव मोरे | Updated: August 18, 2023 12:06 IST

तुर्भे विभागामधील इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरामधील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी मुंबई: नवी मुंबईतील इंदिरानगर व इतर झोपडपट्टी परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी मिळत नसल्याने त्रस्त नागरिकांनी महानगर पालिका विभाग कार्यालयावर हांडा मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध  केला.

 तुर्भे विभागामधील इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरामधील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेकवेळ दोन - दोन दिवस पाणी येत नाही. रात्री अपरात्री पाणी येत असल्यामुळेही नागरिकांची गैरसोय होत आहे. तीव्र पाणी टंचाईमुळे रहिवासी त्रस्त आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण आहे. नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा केला जात असल्याचा दावा महानगरपालिका करत आहे. परंतु इंदिरानगर झोपडपट्टीमधील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. हा प्रश्न साेडविण्यासाठी १८ ऑगस्टला हंडा  मोर्चा काढला.

  सिडको विकसीत नोडप्रमाणे सकाळी व सायंकाळी नियमीत वेळेत पाणी पुरवठा करण्यात यावा.  इंदिरानगर झोपडपट्टीलाही एमआयडीसीऐवजी मोरबे धरणातून पाणी पुरवठा करण्यात यावा. पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आवश्यक जलकुंभ, जलवाहिन्या टाकण्यात याव्यात अशा मागण्या केल्या.  यावेळेस जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, उपशहरप्रमुख महेश कोठीवाले, प्रकाश पाटील, माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर,सिद्धाराम शिलवंत यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीकपात