शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेमिंगोंच्या अधिवासावर टॉवर्स? CRZ चा दणका; आलिशान गृहप्रकल्पाला पर्यावरणीय कायद्यांचा चाबूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 06:42 IST

प्रकल्प स्थानासह न्यायालयीन प्रकरणांची मागितली सद्यस्थिती

नारायण जाधवनवी मुंबई : फ्लेमिंगोंच्या अभयारण्यालाच छेद देणाऱ्या पाम बीच मार्गावरील बहुचर्चित आलिशान गृहप्रकल्पाला पर्यावरणीय कायद्यांचा चाबूक बसला. नेरूळ सेक्टर ६० मधील मिस्त्री कन्स्ट्रक्शनचा प्रकल्प सीआरझेड प्राधिकरणाने थेट मंजुरी नाकारून प्रलंबित ठेवल्याने पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला मोठे बळ मिळाले आहे.

किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने बैठकीत प्रकल्पाच्या सल्लागाराला  निर्देश देऊन प्रकल्पाचे नेमके स्थान, सध्याची बांधकाम स्थिती आणि न्यायालयातील प्रकरणांची माहिती सादर करण्यास सांगितले.  संवेदनशील भागात बांधकामाचा प्रयत्न झाल्याने  कारवाई ‘इशारा’ मानली जाते. यामुळे या प्रकल्पास सिडकोने दिलेली बांधकाम परवानगीसुद्धा वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

पर्यावरणप्रेमी काय भूमिका घेतात याकडे लक्ष?हा गृहप्रकल्प रस्त्याच्या समुद्राकडील भागात किंवा तो जमिनीकडील भागात आहे, याचा नकाशाही मागितला आहे. सदर गृहप्रकल्प हा पामबीच मार्गावर समुद्राकडील भागावर विकसित होत असल्याने सीआरझेड प्राधिकरण विकासकाच्या प्रस्तावावर कोणता निर्णय घेते, पर्यावरणप्रेमी काय भूमिका घेतात, यावर या आलिशान गृहप्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.

प्रकल्पाचा भूखंड सीआरझेड-२ क्षेत्रातहा भूखंड सीआरझेड-२ या कक्षेत येत असल्याने पर्यावरण, वन व हवामान बदल विभागाने १५ ऑगस्ट २०१८ च्या आदेशानुसारच बांधकाम परवानगी देणे अपेक्षित होती. या अधिसूचनेमुळे हा  त्यांना १ चटई निर्देशांकानुसार बांधकाम परवानगी देणे अपेक्षित असताना सिडकोने १.५ चटई निर्देशांक गृहीत धरून दिलेली मंजुरी आता वादात सापडण्याची शक्यता आहे.

२५ ऑगस्ट २०२३ रोजी पर्यावरण,वन व हवामान बदल विभागाने भरती रेषेची सीमा १००वरून ५० मीटरवर आणली. तरी विकासक मिस्त्री कन्स्ट्रक्शनने तेथे बांधकाम सुरू केल्याने व कार्योत्तर मंजुरीची तरतूद सीआरझेड कायद्यात नसल्याने सीआरझेडने १९ जानेवारी २०२६ च्या १९३ बैठकीत बैठकीत प्रकल्प सल्लागाराला गृहप्रकल्पाचे सध्याचे स्थान आणि न्यायालयातील प्रकरणाची सद्यस्थिती सादर करण्यास सांगून याबाबतचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे.

महापालिकेने नोंदविला होता आक्षेप: सिडकोने मिस्त्री कन्स्ट्रक्शन कंपनी लि. ला नेरूळ सेक्टर ६० मधील पॉकेट डी व ई येथील २७००० चौ.मी च्या भूखंडावर रहिवासी व वाणिज्य वापरासाठीची बांधकाम परवानगी २०१८ रोजी दिली होती. मात्र, शहराचे नियोजन प्राधिकरण आपण असल्याचे सांगून नवी मुंबई महापालिकेने याबाबत आपला आक्षेप नोंदविला होता. याला शहरातील पर्यावरणप्रेमींनीसुद्धा आक्षेप घेऊन आंदोलन केले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Flamingo Habitat Towers Face CRZ Hurdle; Luxury Project Challenged

Web Summary : A luxury housing project near the flamingo sanctuary faces environmental hurdles. CRZ authorities have delayed approval for Mistry Construction's Nerul project, demanding information on its location and legal status. CIDCO's construction permit is now under scrutiny due to CRZ violations and environmental concerns raised by activists.
टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाCourtन्यायालय