शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गौतमीच्या कार्यक्रमात सापाचा ‘नागीन डान्स’, कामोठ्यात दर्शकांकडून खुर्च्यांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 14:44 IST

या कार्यक्रमाला तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र कार्यक्रमात सापाच्या एंट्रीने एकच धावपळ उडाल्याचे पाहावयास मिळाले.

पनवेल : गौतमी पाटीलची क्रेज संपूर्ण महाराष्ट्रात पाहावयास मिळत आहे. पनवेलमधील कामोठ्यात प्रथमच राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी ९ ऑक्टोबर रोजी गौतमी पाटील आली होती. 

या कार्यक्रमाला तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र कार्यक्रमात सापाच्या एंट्रीने एकच धावपळ उडाल्याचे पाहावयास मिळाले. याच दरम्यान काही हुल्लडबाज दर्शकांनी कार्यक्रमात खुर्च्यांची तोडफोड करून राडा केल्याने पोलिसांना गर्दीला पांगवण्यासाठी कारवाई करावी लागली.

पाेलिस असतानाही गाेंधळगौतमी येणार असल्याने पनवेलसह नवी मुंबईमधील तरुण कार्यक्रमाच्या ठिकाणी जमा झाले होते. कार्यक्रमात अनुचित प्रकार घडू नये म्हणून खासगी सुरक्षारक्षकांसह पोलिस बंदोबस्तदेखील ठेवला होता. यावेळी काही उत्साही तरुणांनी खुर्च्या उचलून एकमेकांवर भिरकावण्याचा प्रकार केला. दरम्यान कार्यक्रमाच्या मध्यंतरी अचानक साप शिरल्याने एकच पळापळ उडाली. एका तरुणाला साप चावल्याचीदेखील चर्चा याठिकाणी सुरू होती. मात्र, सापाने अचानक एन्ट्री केल्याने चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.

टॅग्स :Gautami Patilगौतमी पाटीलpanvelपनवेलsnakeसाप