शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भिक लागली काय, मी तुला फुकट पोसणार काय ? शशांकने मागितले होते 2 कोटी 
2
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
3
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
4
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
5
"१५ हजारांचा चाजनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
6
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
7
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
8
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
9
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
10
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
11
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
12
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
13
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
14
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
15
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
16
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!
17
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'
18
Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
20
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी

आईच्या शस्त्रक्रियेसाठी ठेवलेल्या पैशांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 02:37 IST

आईची शस्त्रक्रिया करण्यासाठी सुरक्षारक्षकाने साठवलेल्या दीड लाख रुपयांचा अपहार झाला आहे.

नवी मुंबई : आईची शस्त्रक्रिया करण्यासाठी सुरक्षारक्षकाने साठवलेल्या दीड लाख रुपयांचा अपहार झाला आहे. एटीएममधून परस्पर पैसे हडप करण्यात आले आहेत. पैसे परत मिळावे यासाठी तीन महिने बँक व्यवस्थापनासह पोलीस स्टेशनमध्ये हेलपाटे मारत आहे. बँक व्यवस्थापन फक्त आश्वासने देत असल्यामुळे कंटाळलेल्या सुरक्षारक्षकाने उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या विकास भिलारे या तरुणाचे मार्केटमधीलच युनियन बँकेमध्ये खाते आहे. आईची प्रकृती ठीक नसून तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने भिलारे याने दीड लाख रुपयांची बचत केली होती. १२ मार्चला अचानक त्यांच्या बँक खात्यामधून दहा हजार रुपये काढण्यात आले. थोड्या वेळाने पुन्हा दहा व पाच असे एकूण २५ हजार रुपये काढण्यात आले. दुसऱ्या दिवशी दोन वेळा दहा हजार, एक वेळा ५ हजार व एक वेळा ४ हजार असे एकूण ५४ हजार रुपये काढले. तिसºया दिवशी ४६ हजार ८९९ रुपये काढण्यात आले. तिसºया दिवशीही बँकेतून २५ हजार रुपये रोख रक्कम काढण्यात आली व बंगळुरूमधील लक्ष्मी गारमेंट दुकानामधून २५ हजार रुपयांची खरेदी केली आहे. तीन दिवसांमध्ये तब्बल १ लाख ५० हजार ८९९ रुपये काढण्यात आले आहेत.बँकेतून पैसे काढल्याचे कळताच भिलारे व त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. त्यांनी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी त्यांना बँकेत जाण्याचा सल्ला दिला. बँकेने पुन्हा सायबर सेलमध्ये जाण्यास सांगितले. सायबर सेलने बँकेत पाठविले. बँकेत लेखी पत्र दिले. तीन महिन्यांपासून वारंवार पाठपुरावा सुरू आहे. परंतु अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही.बँकेने तीन महिन्यानंतर तुमच्या एटीएम कार्डचा वापर करूनच पैसे काढल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. परंतु भिलारे यांनी माझ्या एटीएमचा वापर झालेला नाही. वाटल्यास सीसीटीव्हीचे फुटेज पहावे असेही सुचविले. परंतु वेळकाढूपणा केला जात आहे. न्याय मिळत नसल्याने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी युनियन बँकेच्या एपीएमसीमधील शाखेत फोन केला, परंतु व्यवस्थापकांशी संपर्क होवू शकला नाही.>आईच्या शस्त्रक्रियेसाठी जमविलेले पैसे एटीएममधून परस्पर काढण्यात आले असून बंगळुरूमध्ये खरेदी केली आहे. पैसे नसल्याने आईची शस्त्रक्रिया रखडली आहे. तीन महिने पाठपुरावा करूनही युनियन बँक व्यवस्थापन दाद देत नसून आता दखल घेतली नाही तर बँकेच्या समोर आमरण उपोषण करणार आहे.- विकास भिलारे,पीडित सुरक्षारक्षक