शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

यादवनगरमध्ये अतिक्रमणाचे साम्राज्य

By admin | Updated: April 19, 2016 02:39 IST

औद्योगिक वसाहतीमधील यादवनगर परिसराला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. उद्योगासाठी राखीव असलेली जवळपास ५० एकर जमीन परप्रांतीयांनी बळकावली आहे

नामदेव मोरे, नवी मुंबई औद्योगिक वसाहतीमधील यादवनगर परिसराला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. उद्योगासाठी राखीव असलेली जवळपास ५० एकर जमीन परप्रांतीयांनी बळकावली आहे. प्रकल्पग्रस्तांची घरे तोडणारे एमआयडीसी, सिडको व पालिका प्रशासनाने परप्रांतीयांच्या अतिक्रमणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून, व्होटबँकेसाठी त्यांना राजकीय वरदहस्त मिळू लागला आहे. महापालिकेच्या प्रभाग ६ मधील पोटनिवडणुकीमुळे पूर्ण शहराचे लक्ष यादवनगरवर केंद्रित झाले होते. एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण करून उभारलेल्या झोपड्यांचा परिसर या प्रभागात येतो. निवडणूक लागल्यापासून सर्वच राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते येथे तळ ठोकून बसले होते. रामअशिष यादव यांचा बालेकिल्ला असणाऱ्या या परिसरामधील अतिक्रमण पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जवळपास ५० एकर जमिनीवर वसाहत उभारण्यात आली आहे. फक्त रहिवासी संकुलच नाही तर दुकाने, तबेले, लघू उद्योग व इतर अनेक व्यवसाय सुरू केले आहेत. उद्योगासाठी असलेली जागा बळकावल्यानंतर आता हायटेन्शन व वन विभागाच्या जागेवरही अतिक्रमण सुरू झाले आहे. यादव साम्राज्य म्हणून हा परिसर ओळखला जाऊ लागला आहे. जवळपास ५ हजार झोपड्या येथे झाल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये जवळपास ९० टक्के परप्रांतीयांचा समावेश आहे. येथे पालिका व एमआयडीसीचे नियम लागू होत नाहीत. कोणतीही परवानगी न घेता येथे बोअरवेल मारण्यात आल्या आहेत. करोडो रुपयांच्या जमिनीवर गोडाऊन उभारली आहेत. प्रत्येक वर्षी शेकडो झोपड्या उभारल्या आहेत. वसाहतीमध्ये जिथे जागा मिळेल तेथे तत्काळ झोपडी उभारली जात आहे. रोडच्या बाजूला मोठ्या प्रमाणात भंगार खेरदी-विक्रीची गोडाऊन उभी केली आहेत. एमआयडीसी मुख्य रोडच्या बाजूचे अतिक्रमण हटविते, परंतु यादवनगरचे साम्राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विभागात अजिबात कारवाई होत नाही. यादवनगरमध्ये जवळपास ५० एकर जमिनीवर अतिक्रमण झाले आहेत. मागील बाजूला असणाऱ्या वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी झोपड्या उभारण्यास सुरुवात झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेकडे जवळपास २००० हजार पासूनचे गुगल मॅप उपलब्ध आहेत. गुगल मॅप पाहिले तरी गत १५ वर्षांमध्ये किती अतिक्रमण झाले, हे स्पष्ट होऊ शकते. परंतु कारवाई करण्यास राजकीय अडथळे येत असल्याने प्रशासन तेथे कारवाईच करीत नाही. शहरामध्ये प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे कडक पोलीस बंदोबस्तामध्ये पाडली जातात. प्रकल्पग्रस्तांना भूमाफिया ठरविण्याची स्पर्धा सुरू असताना दुसरीकडे परप्रांतीयांनी बिनधास्तपणे जागा हडप केल्यानंतरही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे शहरातील प्रकल्पग्रस्त नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.