शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी सुट्ट्यांमुळे बेकायदा वाहतुकीचे पेव; आरटीओ, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 00:55 IST

शाळांना सुट्ट्या लागल्याने शहरातील नागरिक गावी जाण्यासाठी बस थांब्यांवर गर्दी करीत आहेत. एसटी बसला गर्दी असल्याने बेकायदा वाहतूक करणारे वाहतूकदार या गर्दीचा गैरफायदा घेत आहेत.

नवी मुंबई : शाळांना सुट्ट्या लागल्याने शहरातील नागरिक गावी जाण्यासाठी बस थांब्यांवर गर्दी करीत आहेत. एसटी बसला गर्दी असल्याने बेकायदा वाहतूक करणारे वाहतूकदार या गर्दीचा गैरफायदा घेत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक आणि प्रवाशांची जादा आर्थिक लूट देखील होत असून यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.नवी मुंबई शहरात राज्यातील विविध भागातील नागरिक वास्तव्य करीत आहेत. शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असून लग्नसराई देखील सुरु आहे. त्यानिमित्ताने गावी ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. एसटी बसचे आरक्षण देखील फुल्ल असल्याने नागरिकांना महामार्गावरील बस थांब्यांवर जाऊन मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत आहे. नवी मुंबई शहरात ठाणे-बेलापूर आणि सायन- पनवेल महामार्गावर एसटी बसचे थांबे आहेत. सायन- पनवेल महामार्गावरील वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरु ळ, बेलापूर, खारघर, कळंबोली, खांदा वसाहत आणि पनवेल आदी बस स्टॉपवर प्रवासी मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. खाजगी वाहतूकदार या गर्दीचा गैरफायदा घेत असून प्रवासी घेण्यासाठी बसस्टॉपवर गर्दी करीत आहेत. यामुळे महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या देखील निर्माण होत आहे. भाजीपाला, दूध आदी मालवाहतूक करणारे ट्रक, टेंपो चालक देखील या गर्दीचा फायदा घेऊन पुणे, चाकण, राजगुरूनगर, नारायणगाव, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आदी भागातील प्रवासी घेण्यासाठी बस स्टॉपवर थांबत आहेत.टेंपोसारख्या वाहनांमध्ये चालकाच्या केबिनमध्ये तसेच मागील बाजूस प्रवासी बसवून त्यांची वाहतूक केली जात आहे. अवैध वाहतूक करणारे वाहनचालक प्रवाशांकडून एसटीच्या प्रवास भाड्यापेक्षा अधिक भाडे वसूल करीत आहेत. ट्रॅव्हल्स बस, कार, जीपसारखे वाहनचालक देखील या प्रवाशांच्या गरजेचा गैरफायदा घेत असून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करीत असून मनमानी पद्धतीने पैसे आकारत आहेत. प्रवासी घेण्यासाठी अवैध वाहतूक करणारी लहान-मोठी सर्व वाहने बस स्टॉपवर उभी केली जात असल्याने इतर वाहनांना तसेच एसटी बसला अडथळा निर्माण होत असून वाहतूककोंडीच्या समस्या निर्माण होत आहेत. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई