शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पदपथाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 04:44 IST

जीवाला धोका : वृक्ष कोसळल्याने तुटला पदपथ

नवी मुंबई : सीबीडी येथील खचलेला पदपथ दोन महिन्यांपासून तसाच असल्याने पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. रहदारीच्या मुख्य चौकालगतच हा प्रकार घडलेला असल्याने पादचाऱ्यांना रस्त्याने चालावे लागत आहे. अशातच त्याठिकाणी डागडुजीअभावी उर्वरित रस्तादेखील खचत चालल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.

सीबीडी सेक्टर ६ येथे सुमारे दोन महिन्यांपूर्वी ही दुर्घटना घडली आहे. रस्त्यालगतच्या वर्षा अपार्टमेंटमधील सुमारे ५० वर्षांपूर्वीचे जुने झाड पावसामुळे कोसळले. हे झाड सोसायटीची भिंत तोडून लगतच्या पदपथावर कोसळले. यामध्ये नाल्यावरील पदपथ तुटून नाला उघडा झाला आहे. या दुर्घटनेनंतर त्याठिकाणच्या पदपथाची तत्काळ दुरुस्ती करून नाला बंदिस्त करण्याची गरज होती. मात्र, दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनदेखील प्रशासनाकडून नाला दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही. परिणामी, लगतच्या वर्षा अपार्टमेंटमधील रहिवासी दुर्गंधीने त्रस्त आहेत. शिवाय रात्रीच्या वेळी एखादा पादचारी त्याठिकाणी नाल्यात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीबीडी पुलाखालील मुख्य चौकात अनेकदा वाहतूककोंडी होत असते.यावेळी गर्दीतून वाट काढण्याच्या प्रयत्नात पुढे जाणाºया एखाद्या दुचाकीस्वाराचा देखील त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे; परंतु दोन महिन्यांपासून लोकप्रतिनिधी, तसेच प्रशासन यांच्याकडे सातत्याने प्रयत्न करूनदेखील तुटलेले पदपथ वेळीच दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप रहिवासी श्रीकृष्ण गावडे यांनी व्यक्त केला आहे. तर भविष्यात त्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल असाही आरोप त्यांनी केला आहे.

पदपथ तुटून नाला उघड्यावर आल्याने दूषित पाण्याची दुर्गंधी व त्यामधील डासांचा सोसायटीमधील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आरोग्याचाही धोका निर्माण झालेला असतानाही प्रशासन गांभीर्य घेत नसल्याच्या कारणांचेही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी