शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

अग्रोळी गावातील समस्यांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: July 3, 2017 06:37 IST

अग्रोळी गावात प्रकल्पग्रस्तांना खेळासाठी मैदान, तसेच उद्यानाचे शहर अशी ओळख असलेल्या शहरातील या परिसरात उद्यान नसल्याने

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अग्रोळी गावात प्रकल्पग्रस्तांना खेळासाठी मैदान, तसेच उद्यानाचे शहर अशी ओळख असलेल्या शहरातील या परिसरात उद्यान नसल्याने ग्रामस्थांकडून महापालिका प्रशासनाच्या उदासीन काराभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात आगे. गेली कित्येक वर्षे या ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीचा प्रश्न आजवर मार्गी लागला नसून शहर विकास करताना गावठाणाचा विकास का केला जात नाही? असा जाब प्रशासनाला विचारण्यात आला आहे. गेली कित्येक वर्षे अग्रोळी गावातील समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगरसेविका सरोज पाटील यांनी व्यक्त केली. मैदान तसेच उद्यानाचा अभाव असलेल्या या गावातील मुलांनी खेळण्यासाठी कुठे जायचे? असा प्रश्न पाटील यांनी सर्व साधारण सभेतही उपस्थित केला होता. मात्र, याकडे गांभीर्याने लक्ष घातले जात नसल्याने दिवसेंदिवस गावातील समस्या वाढत असल्याचा असंतोष पाटील यांनी व्यक्त केला. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी कवडीमोलात घेऊनदेखील सिडको आम्हाला नोटीस बजावून त्रास देत आहे. या ठिकाणी स्कायवॉक नसल्याने रहिवाशांना, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन मार्ग ओलांडावा लागत आहे. महासभेत मांडलेल्या या समस्यांवर पुढील महासभा बैठकीत अत्यावश्यक कामांचे प्रस्ताव पटलावर आणून मंजूर करण्याचे आश्वासन महापौर सुधाकर सोनावणे यांनी दिले.सतत पाठपुरावा करून तसेच विविध विभागांतील अधिकाऱ्यांची भेट घेऊनही कामाला सुरुवात केली जात नाही, याचा अर्थ नगरसेवकांना अधिकाऱ्यांकडून काही किंमतच दिली जात नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नगरसेविका सरोज पाटील यांनी व्यक्त केली. अग्रोळी गावातील समस्या लवकरात लवकर सोडविल्या नाहीत तर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारादेखील पाटील यांनी दिला.