शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मास्कसह स्वच्छतेमुळे साथरोग नियंत्रणात, रुग्णालयातील रांगा झाल्या कमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 01:41 IST

health News : कोरोनामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे साथरोगांचे प्रमाणही कमी झाले आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई - कोरोनामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे साथरोगांचे प्रमाणही कमी झाले आहे. यामुळे मनपाच्या रुग्णालयातील रुग्णसंख्याही १,५०० वरून ५०० वर आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांच्या लक्षात येऊ लागले आहे. घराबाहेर वावरताना मास्कच वापर केला जात आहे. सॅनिटायझरचा वापर करण्यात येत असून, हात वारंवार धुतले जात आहेत. पालिकेने कारवाई सुरू केल्यामुळे व पानटपऱ्यांवर बंधने घातल्यामुळे थुंकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आहारामध्येही बदल झाल असून, या सर्व उपाययोजनांचा परिणाम आरोग्य सुधारण्यासाठी होऊ लागला आहे. कोरोनापूर्वी खासगी व सरकारी रुग्णालयात ताप, सर्दी, खोकला व इतर किरकोळ आजार झालेले रुग्ण उपचारासाठी रांगेत थांबलेले चित्र पाहावयास मिळत होते, परंतु सद्यस्थितीमध्ये ही संख्या रोडावली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये पूर्वी १,२०० ते १,५०० रुग्ण प्रतिदिन उपचारासाठी येत होते. आता ही संख्या ५०० वर आली आहे. इतर रुग्णालयातही हीच स्थिती आहे.  

मास्कने अनेक साथीच्या आजारांना घातला आळामास्कचा वापर व स्वच्छता यामुळे अतिसार, डांग्या खोकला व इतर आजारांना आळा घातला आहे. विषाणूजन्य आजारांचा फैलाव कमी झाला आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने ताप व इतर अजारही थांबल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. कोरोना काळात लागलेली स्वच्छतेची सवय व आरोग्याविषयी जागरुकता नागरिकांनी कायम ठेवावी असे आवाहन ही डाॅक्टरांनी केले आहे. 

विषाणूजन्य आजारदरवर्षी साथीचे आजार कमी करण्यासाठी पालिकेला मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागते. धुरीकरण, औषध फवारणी करावी लागते.  आता पालिकेबरोबच सामाजिक कार्यकर्ते स्वखर्चाने फवारणी करू लागले आहेत.  या सर्व उपाययोजनांमुळे विषाणूजन्य आजारांचा फैलाव कमी झाला असून यावर्षी डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भावही कमी झाला आहे. 

 नागरिकांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता वाढू लागली आहे. मास्कचा वापर, हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे कमी झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून लोकांच्या सवयीमध्ये सकारात्मक बदल झाले असून त्यामुळे सर्वच प्रकारच्या ओपीडीमधील संख्या  कमी झाली आहे.- डॉ. प्रशांत जवादे , आरोग्य अधिकारी, महानगरपालिका 

टॅग्स :Healthआरोग्यNavi Mumbaiनवी मुंबई