तळोजा येथे पत्नी, दोन मुलांची हत्या करून पतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 05:04 AM2020-02-23T05:04:33+5:302020-02-23T05:04:50+5:30

दीड महिन्यापासून कोणालाही थांगपत्ता नाही; बंद फ्लॅटमध्ये कुजले मृतदेह

Husband commits suicide by killing wife, two children in Taloja | तळोजा येथे पत्नी, दोन मुलांची हत्या करून पतीची आत्महत्या

तळोजा येथे पत्नी, दोन मुलांची हत्या करून पतीची आत्महत्या

Next

पनवेल : तळोजा फेज वन सेक्टर ९ येथील शिव कॉर्नर सोसायटीत एका बंद घरात शनिवारी चौघांचे मृतदेह आढळले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नी, मुलांची हत्या करून, नंतर नितेश उपाध्याय यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.

नितेश उपाध्याय (३५), बबली उपाध्याय (३०) अशी या पती-पत्नीची नावे असून, मुलांची नावे समजू शकलेली नाहीत. शिव कॉर्नर सोसायटीतील घर नंबर ५०२चे मालक राजेश भारद्वाज यांनी, त्यांचे घर नितेश उपाध्याय यांना सप्टेंबर, २०१९ मध्ये भाड्याने दिले होते. उपाध्याय यांची पत्नी, तसेच दोन मुले या ठिकाणी राहत होते. उपाध्याय हे नियमित ५ ते ६ तारखेला भाडे देत असत. दोन महिन्यांपासून घरभाडे मिळाले नसल्याने भारद्वाज हे उपाध्याय यांना नेहमी फोन करत होते. मात्र, फोनला प्रतिसाद न मिळाल्यामुळे भारद्वाज या सोसायटीत आले व सोसायटीतील सेक्रेटरी व अध्यक्ष यांना घेऊन ते घरात गेले. घर आतून बंद आढळल्याने त्यांनी आपल्याकडील चावीने घराचा दरवाजा उघडला. या वेळी आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांना चौघांचे मृतदेह सापडले.

सुसाइड नोट सापडली
घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोटदेखील सापडली आहे. यात आम्ही आत्महत्या
करत असून, त्याबाबत कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच आतील रूममध्ये दागिने आहेत व आमचे कोणीही नातेवाईक नाहीत, असे उपाध्याय यांनी त्यात लिहिलेले आहे. ज्यांना कोणाला आमचे मृतदेह सापडतील, त्यांनी हिंदू धर्मानुसार अंत्यसंस्कार करावे, असे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे.

Web Title: Husband commits suicide by killing wife, two children in Taloja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.