शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उरण-पनवेल परिसरातील शेकडो दगडखाणी-क्रशर, डांबर, रेडीमिक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 19:00 IST

प्लांटवर बंदी उठली : प्लांटची धडधड वाढल्याने हवेतील प्रदुषणाचा स्तरही तिपटीने वाढला

मधुकर ठाकूर

उरण : शिवडी- न्हावा सेतूच्या (अटल सेतू ) उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी मागील दहा दिवसांपासून उरण, पनवेल , नवीमुंबई परिसरातील बंद करण्यात आलेल्या शेकडो क्रशर- दगडखाणी, डांबर, रेडीमिक्स प्लांट सोमवारपासून (१५) सुरू करण्यात आले आहेत.यामुळे क्रशर-दगडखाण आणि बांधकाम व्यावसायिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.मात्र क्रशर-दगडखाणी पुन्हा धूर ओकू लागल्याने परिसरातील हवेतील प्रदुषणाचा स्तर लागलीच वाढला आहे . अटल सेतूच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्ताने उरण-पनवेल-बेलापुर दरम्यान रस्ते, राष्ट्रीय महामार्गावरील जासई, गव्हाण, बंबावीपाडा, कुंडेवहाळ,ओवळे ग्रामपंचायत, सिडकोच्या हद्दीत  सुरू असलेल्या क्रशर- दगडखाणी,डांबर, रेडीमिक्स प्लांट ६ ते १३ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचे सक्तीचे आदेश दिले होते.तसेच परिसरात धुळ फैलावत प्रदुषणाला कारणीभूत ठरत असलेल्या क्रशर- दगडखाणी,डांबर, रेडीमिक्स प्लांट यांचा विद्युत पुरवठाच बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.यामुळे मागील दहा  दिवसांपासून शेकडोंच्या संख्येने क्रशर- दगडखाणी, डांबर, रेडीमिक्स प्लांट बंद ठेवण्यात आले होते. मागील दहा दिवसांपासून दररोज परिसरात प्रचंड प्रमाणात प्रदुषण फैलावणाऱ्या क्रशर- दगडखाणी, डांबर, रेडीमिक्स प्लांटची धडधड थांबल्यामुळे हवेतील धुळीचे प्रमाण प्रमाणापेक्षाही कमी झाले होते.

कधी नव्हे तर प्रदुषणाचा आयक्यूए स्तर १०० पर्यंत खाली आला होता.तसेच बंद करण्यात आलेल्या क्रशर- दगडखाणी, डांबरप्लांट, रेडीमिक्स प्लांटमुळे बांधकामासाठी खडी,दगड,ग्रीट आदी साहित्य मिळेनासे झाले होते.परिणामी उरण, पनवेल,नवीमुंबई परिसरातील बांधकाम व्यवसायही ठप्प झाला होता. या सक्तीच्या बंदमुळे मात्र संबंधित व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मागील दहा दिवसांपासून उरण, पनवेल , नवीमुंबई परिसरातील बंद करण्यात आलेल्या शेकडो क्रशर- दगडखाणी, डांबर, रेडीमिक्स प्लांट जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर सोमवारपासून (१५)सुरू पुन्हा एकदा सुरू करण्यात आले असल्याची माहिती श्री कान्होबा दगडखाण व क्रशर चालक-मालक संस्थेचे अध्यक्ष सुनील भोईर यांनी दिली.

सोमवारपासून क्रशर-दगडखाणींची धडधड पुन्हा सुरू झाली आहे.उरण-पनवेल परिसरातील क्रशर-दगडखाणी,डांबर, रेडीमिक्स प्लांट पुन्हा धूर ओकू लागल्याने परिसरातील प्रदुषणाचा आयक्यूए स्तर लागलीच २५० ते ३०० पर्यंत वाढला आहे.बांधकाम व्यावसायिकांची समस्या मिटली असली तरी मात्र परिसरातील प्रचंड प्रमाणात वाढत्या प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबई