शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

नवी मुंबई विमानतळाच्या मार्गातील अडथळे दूर होणार कसे?

By नारायण जाधव | Updated: June 23, 2025 11:58 IST

Navi Mumbai airport Update: ‘डीजीसीए’च्या सूचनेनुसार, नोटोम अर्थात ‘नोटीस टू एअरमन’ यादीतील २२५ अडथळ्यांची शर्यत पार करण्याचे आव्हान सिडको आणि नवी मुंबई विमानतळ कंपनीसमोर आहे.

- नारायण जाधव, उपवृत्तसंपादकनवी मुंबईविमानतळाचे काम वेगाने सुरू असताना इंडिगो, आकासासारख्या कंपन्यांनी नवी मुंबईविमानतळ कंपनीशी  विमानोड्डाणासाठी करारनामे करण्यास वेगाने सुरुवात केली आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाला झालेल्या अपघातानंतर महत्त्वाच्या शहरांमधील विमानतळांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या फनेल झोनमधील ४८ इमारतींच्या उंचीचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असतानाच नवी मुंबई विमानतळाच्या टेक ऑफ आणि लँडिंगच्या मार्गात उघड्यावर होणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलींसह विविध २२५ अडथळे चर्चेत आले आहेत.  ‘डीजीसीए’च्या सूचनेनुसार, नोटोम अर्थात ‘नोटीस टू एअरमन’ यादीतील २२५ अडथळ्यांची शर्यत पार करण्याचे आव्हान सिडको आणि नवी मुंबई विमानतळ कंपनीसमोर आहे. यातील प्राणी कत्तलीची तक्रार तर ‘नॅट कनेक्ट फाउंडेशन’ने  मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर नोटोमनुसार या विमानतळाच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची जबाबदारी सिडकोची आहे.

भारताच्या एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन पब्लिकेशन (एआयपी)नुसार सुरक्षित विमान संचलनासाठी  प्रमुख पायाभूत सुविधांसह नवी मुंबई विमानतळाच्या मार्गात ८६ इमारती, ७९ टेकड्या, २३ पॉवर ट्रान्समिशन टॉवर्स, १२ मोबाइल टॉवर्स, ८ फ्लडलाइट पोल हे अडथळे आहेत. 

विमानांच्या सुरक्षित हालचालींसाठी ते दूर करण्यास सांगितल्यानंतर विमानतळ कंपनी आणि सिडकोने त्यावर कार्यवाही सुरू केली आहे. याच दरम्यान उलवे, द्रोणागिरी, बेलापूर ते नेरूळ-सीवूड परिसरातील अनेक सोसायट्यांना उंची कमी करण्यासह इमारतींवरील मोबाइल टॉवर, पाण्याच्या टाक्या हटविण्यास सांगितले गेले आहे. 

विमानतळाच्या  मार्गातील जमिनीचे भाव गगनाला भिडल्याने खास बिल्डर्सच्या आग्रहास्तव सिडकोने नवी मुंबई विमानतळ परिसरातील इमारतींसाठी निर्धारित उंचीचा नियम ५५.१ मीटरवरून थेट १६० मीटरवर नेला आहे. त्यामुळे वाढलेल्या उंचीचे आता काय करायचे हा प्रश्न आहे.

नवी मुंबई विमानतळासाठी आधीच्या प्रस्तावित रडार यंत्रणेची जागा बदलून ती धाकले आयलंडवर नेली आहे. यामुळे बिल्डर्सचे दोन ते तीन हजार कोटींचे प्रकल्प सुटले आहेत. परंतु, सध्या हे रडार कागदावरच आहे. 

धाकले आयलंडवरील जेट्टीचे काम प्राथमिक टप्प्यातच आहे. कनेक्टिव्हिटीसाठी रस्ते, पुलांची कामेही धीम्या गतीने सुरू आहेत. विमानतळावर इंधन पुरवठ्यासाठी जेएनपीएतील इंडियन ऑईलपासून विमानतळापर्यंत २२ किमी तर तुर्भेतील एचपीसीलपासून विमानतळापर्यंत १०.४५ किमीची पाइपलाइन टाकण्यास मंजुरी मिळाली आहे. 

या कामांना अजूनही   गती नाही. मग  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानांना लागणारे जेट इंधन आणणार कोठून? या प्रश्नांसह एनआरआय, टीएसचाणक्य, डीपीएस तलावासह पाणजे पाणथळींवरील पक्ष्यांचा अडथळा दूर कसा करणार? हा एक प्रश्न आहे.

टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबई