शहरं
Join us  
Trending Stories
1
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
2
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
3
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
4
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
5
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
6
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
7
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
8
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
9
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
10
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
11
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
12
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
13
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
14
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
15
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
16
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
17
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
19
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
20
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

आरोपीच्या हातातील गावठी कट्ट्यातील गोळीने त्यांचाच साथीदार जखमी; दोघे अटकेत 

By पंकज पाटील | Updated: July 16, 2023 18:48 IST

आरोपींच्या साथीदाराच्या उजव्या मांडीत लागल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

अंबरनाथ : एका फायरिंग प्रकरणातील विवेक नायडू याचा बदला घेण्यासाठी निघालेल्या तीन आरोपींनी अंबरनाथमध्ये नायडू यांच्या मित्रांना अडून त्यांच्यावर गावठी कट्टा रोखला असता त्यातून निघालेली गोळी आरोपींच्या साथीदाराच्या उजव्या मांडीत लागल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या फायरिंग प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी आरोपी चंदन भदोरिया व रोहीतसिंग पुना यांना अटक केली असून त्यांचा तिसरा साथीदार अलोक यादव हा रुग्णालयात उपचार घेत आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी चंदन भदोरिया याच्या भावावर विवेक नायडू नावाच्या गुन्हेगाराने अग्निशस्त्राने फायर केले होते. त्याबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. आपल्या भावावर झालेल्या फायरचा बदला घेण्यासाठी चंदन भदोरिया हा आपले साथीदार रोहितसिंग पुना आणि अलोक यादव यांच्या सोबत अंबरनाथ परिसरात मोटरसायकल वरून फिरत होते. त्यावेळेस अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागातील गणपत धाबा येथे आतिश पवार व त्याच्या मित्रास अडवून विवेक नायडू याची माहिती दे असे सांगून चंदन भदोरिया याने आपल्या जवळील गावठी कट्टा काढून तो आतिश पवार यांच्यावर रोखला त्याच वेळेस झालेल्या बाचाबाचीत चंदन भदोरिया याच्याकडील गावठी कट्ट्यातील गोळी निघून ती चंदन भदोरिया याचा साथीदार अलोक यादव यांच्या उजव्या पायाच्या मांडीला लागली. 

त्यामुळे जखमी झालेल्या आपल्या साथीदाराला त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी नेले. दरम्यान अतिश पवार व त्याचा मित्र त्या ठिकाणावरून पळून गेले. या सगळ्या प्रकाराची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपली यंत्रणा सज्ज करून आरोपी चंदन भदोरिया, रोहितसिंग पुना या दोघा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे जनार्दन सोनवणे हे करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी