शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

पांडवकड्याच्या पाण्याने रोखला महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 11:28 PM

खारघरजवळ कोपरा नाला फुटला : सायन-पनवेल महामार्गावर वाहतूककोंडी; कोपरा पुलावरील वाहतूक दोन तास ठप्प

वैभव गायकर।लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : खारघर शहरातील पांडवकडा धबधब्याचे पाणी वाहून नेणारा नाला सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास फुटला. त्यामुळे सायन-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतूककोंडी झाली होती. पाच दिवसांपूर्वी हा नाला खचला होता तेव्हा सिडकोने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे सोमवारी नाला फुटल्याने महामार्ग पाण्यात गेला.

पनवेल परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून खारघर शहरातील पांडवकडा धबधबा ओसंडून वाहत आहे. पांडवकड्याचे पाणी शहरातील नाल्यातून कोपरा खाडीत जाऊन मिळते. कोपरा बस स्थानकाच्या मागील बाजूस नाला वळण घेतो, मात्र सकाळपासून अतिवृष्टीमुळे वळण घेतलेल्या जागेवर नाला फुटला आणि नाल्याचे पाणी मोठ्या प्रवाहात महामार्गावर आले. त्यामुळे कोपरा परिसरातील सायन-पनवेल महामार्ग पाण्याखाली गेला.

कोपरा पुलाखालून पाणी दुसऱ्या लेनवरही गेले. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. केवळ उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होती, मात्र वाहतुकीचा वेग मंदावला होता.खारघरपासून सुरू झालेली वाहतूककोंडी बेलापूर खिंडीपर्यंत पोहचली होती तर दुसºया मार्गावरील वाहतूक खारघर टोल नाक्याच्या पुढे गेली होती. नाला फुटल्याने अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने कोपरा पुलाखालून जाणाºया गाड्या मोठ्या संख्येने उड्डाणपुलाखाली अडकल्या होत्या. पाण्याला वेग असल्याने अनेक चालकांनी वाहने पाण्यातच सोडून दिली. घटनेची माहिती मिळताच पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोपरा नाल्यावरच खारघर शहरात जाण्यासाठी एक पूल उभारण्यात आला आहे.

पुलाच्या खाली असलेल्या पाइपमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ साचल्याने पाण्याचा विसर्ग येथील फुटलेल्या नाल्यातून झाला. पालिकेच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेत पाइपमधील कचरा काढून पाण्याला वाट करून दिल्याने नाल्यातील पाण्याचा विसर्ग थांबला. दुपारी ३ च्या सुमारास पावसाने उसंत घेतल्याने परिस्थिती पूर्ववत झाली. संबंधित घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी, कोपरा ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सुमारे दोन तास कोपरा उड्डाणपुलाखालून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.दोन ठिकाणी शार्टसर्किटशॉकसर्किट व आग लागण्याच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. रविवारी २४ तासामध्ये एक ठिकाणी आग व एक ठिकाणी शॉकसर्किट झाले होते. विजेचा धक्का लागून एकाला जीव गमवावा लागला होता. सोमवारी दोन ठिकाणी शॉकसर्किट झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

नऊ ठिकाणी पाणी साचलेमहानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण ९ ठिकाणी पाणी साचले. एमआयडीसी, वाशी, एपीएमसी, नेरूळ, तुर्भेमधील रोड व नागरी वसाहतीमध्येही १ ते २ फूट पाणी साचले होते. अनेक ठिकाणी अग्निशमन दलाला व आपत्ती व्यवस्थापनाच्या विशेष तुकडीला पाठवावे लागले.वृक्ष कोसळलेपावसाळा सुरू झाल्यापासून प्रतिदिन वृक्ष कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सोमवारी घणसोलीमध्ये दोन वृक्ष कोसळले, याशिवाय जवळपास २० ठिकाणी फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. वृक्ष कोसळून शहरात गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.वाशी खाडीपुलावर वाहतूककोंडीनवी मुंबई : वाशी खाडीपुलावर दोन वाहनांमध्ये किरकोळ अपघाताची घटना सोमवारी सकाळी घडली. यामुळे काही वेळासाठी मुंबईकडे जाणाºया लेनवर वाहतूककोंडी झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांमार्फत अपघातग्रस्त वाहने मार्गातून हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. मुसळधार पावसामुळे शहरातले जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच नोकरी व्यवसाय निमित्ताने मुंबईच्या दिशेने जाणाºयांनाही वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. सोमवारी सकाळी वाशी खाडीपुलावर किरकोळ अपघाताची घटना घडली. यामध्ये अपघातग्रस्त वाहन रस्त्यावर थांबल्याने एक लेन वाहतुकीसाठी बंद झाली होती. परिणामी त्याठिकाणी वाहतूककोंडी होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर सुमारे एक तासानंतर अपघातग्रस्त वाहन त्याठिकाणावरून हटवल्यानंतर वाशी खाडीपुलावरील वाहतुक सुरळीत झाली.