शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

हार्बरवरील प्रवाशांचे बेहाल; सिग्नल यंत्रणा बिघडली, ४० लोकल रद्द झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 07:18 IST

सिग्नल यंत्रणेतील बिघाड ७ वाजता दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरू झाली तरी लोकल खोळंबून राहिल्याने एकामागोमाग एक उभ्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील जुईनगर स्थानकात गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे अप-डाऊन मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली. या बिघाडामुळे हार्बर मार्गावरील ४० लोकलच्या फेऱ्या रद्द तर ३५ लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागला. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. 

सिग्नल यंत्रणेतील बिघाड ७ वाजता दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरू झाली तरी लोकल खोळंबून राहिल्याने एकामागोमाग एक उभ्या होत्या. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी ४० लोकलच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या तर ३५ फेऱ्या उशिराने धावत होत्या, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. 

ऐन सकाळी ही  घटना  घडल्याने  नोकरदारांना  याचा  फटका  बसला. प्रत्येक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. यात विद्यार्थी, ज्येष्ठांना  सर्वाधिक त्रास सहन करावा लागला.

लोकल विलंबाच्या घटना७ ऑक्टोबर :  पावसामुळे रेल्वेच्या सर्व मार्गांवर सेवा विस्कळीत  पश्चिम रेल्वे १५-२० मिनिटे तर मध्य रेल्वे ५७ मिनिटे उशिराने११ ऑक्टोबर :  पावसामुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ७ ते १० मिनिटे उशिराने२७ ऑक्टोबर :  मध्य रेल्वेच्या अंबरनाथ-कर्जत मार्गावर तांत्रिक बिघाड; रेल्वेसेवा १०-१५ मिनिटे उशिराने- २९ ऑक्टोबर :  मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-टिटवाळा दरम्यान ठाणे स्थानकात तांत्रिक बिघाड; रेल्वेसेवा १०-१५ मिनिटे उशिराने- ४ नोव्हेंबर :  पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड; रेल्वेसेवा १५ ते २० मिनिटे उशिराने- ९ नोव्हेंबर :  पश्चिम रेल्वे मार्गावर अंधेरी स्थानकात तांत्रिक बिघाड; रेल्वेसेवा १० ते १५ मिनिटे उशिराने- ९ नोव्हेंबर :  हार्बर मार्गावर धुक्यामुळे रेल्वेसेवा ८ ते १० मिनिटे उशिराने ७ डिसेंबर :  मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड : १० ते १५ मिनिटे उशिराने- १५ डिसेंबर :  हार्बर मार्गावरील जुईनगर रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड : १५ ते २० मिनिटे उशिराने

टॅग्स :Harbour Railwayहार्बर रेल्वे