शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

आंदोलनांचे अर्धशतक!

By admin | Updated: June 16, 2014 02:53 IST

‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय‘आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा...’ अशा नानाविध घोषणांनी गेल्या काही दिवसांत दुमदुमलेल्या आझाद मैदानात रविवारी मात्र स्मशानशांतता होती

चेतन ननावरे, मुंबई‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय...’, ‘आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा...’ अशा नानाविध घोषणांनी गेल्या काही दिवसांत दुमदुमलेल्या आझाद मैदानात रविवारी मात्र स्मशानशांतता होती. शनिवारी सूप वाजलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या १२ दिवसांत नव्या ५७ आंदोलकांनी याठिकाणी धडक देत आपल्या मागण्या लावून धरल्या.बाराही महिने राज्यातील विविध जिल्हे आणि तालुक्यांतून विविध प्रवर्गातील व्यक्ती आणि संघटना मागण्या घेऊन आझाद मैदानावर धडकत असतात. मात्र अधिवेशन काळात येथे होणाऱ्या आंदोलनांच्या संख्येत प्रचंड वाढ होते. आंदोलकांमुळे झालेल्या गर्दीमुळे जत्रेचे स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळते. अधिवेशन काळात प्रत्येक खात्याचे मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी हे मंत्रालयात एकाच वेळी भेटतात. त्यामुळे मागण्यांवर सविस्त चर्चा करून काही महत्त्वाचे निर्णय पदरात पाडून घेता येतील, अशी भाबडी आशा आंदोलकांच्या मनात असते. त्यामुळे आपली सर्व ताकद पणाला लावून हजारोंच्या संख्येने धडक देण्याचा आंदोलकांचा प्रयत्न असतो.यंदा २ जून ते १४ जूनदरम्यान पार पडलेल्या १२ दिवसांच्या अधिवेशन काळात एकूण ५७ नव्या आंदोलकांनी विविध आंदोलनांद्वारे आझाद मैदानावर हजेरी लावली. त्यात धरणे, निदर्शने, एकदिवसीय आणि बेमुदत उपोषण अशा विविध आंदोलनांचा समावेश होता. यंदा आंदोलनांची हाफ सेंच्युरी जरी पूर्ण झाली असली, तरी तोंडावर आलेल्या विधानसभेच्या निवडणंका पाहता हा आकडा फारच कमी मानला जात आहे.