शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

गुजरातवरून विक्रीसाठी आलेला तब्बल ३५ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 2:59 AM

चौघांना अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : गुजरातमधून मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी नवी मुंबईत आला होता. मात्र, ट्रकमधून इतर दोन वाहनांमध्ये हा गुटखा भरला जात असतानाच अमली पदार्थ विरोधी पथकाने रबाळे एमआयडीसी येथे छापा टाकून कारवाई करीत ३५ लाखांचा गुटखा, १४ लाख रुपये किमतीची तीन वाहने असा ४९ लाख ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.गुजरातवरून ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सचिन भालेराव यांना मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत, वरिष्ठ निरीक्षक एन.बी. कोल्हटकर, सहायक निरीक्षक विनया पारासूर, हवालदार सचिन भालेराव, कासम पिरजादे, इकबाल शेख यांच्या पथकाने गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रबाळे एमआयडीसीमधील ओयो सिल्वर हॉटेलसमोरील मोकळ्या मैदानाभोवती सापळा रचला होता. ट्रकमधून पिकअप व कारमध्ये गोण्या भरल्या जात असताना पोलिसांनी छापा मारला असता विमल कंपनीचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी जितू दास (२८), प्रियव्रत दास (२५), मुन्ना यादव (२८) व अखेय खोंडा (२२) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर ट्रक चालकाने अंधारात पळ काढला. अटक केलेल्या चौघांसह पळालेल्या ट्रक चालकाविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.