शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये वाढतोय वेश्या व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 02:52 IST

पनवेल शहरात वेश्याव्यवसाय फोफावू लागला आहे. शहरातील आंबेडकर रस्त्यापासून शिवाजी सर्कलपर्यंत वेश्या दिवसा देखील या ठिकाणी उभ्या असतात.

पनवेल - पनवेल शहरात वेश्याव्यवसाय फोफावू लागला आहे. शहरातील आंबेडकर रस्त्यापासून शिवाजी सर्कलपर्यंत वेश्या दिवसा देखील या ठिकाणी उभ्या असतात. तर कळंबोली येथील खिडूकपाडा जवळील रस्त्यावर उभ्या कंटेनरच्या मागे रात्री सर्रासपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून येते.गेल्या वर्षी आकुर्ली येथे देहविक्रेय करणाऱ्या एका महिलेची हत्या करण्यात आली होती. शहराच्या गजबजलेल्या भागांत देहविक्रेय करणाºया महिलांचा वावर वाढला आहे. बसस्थानक परिसरासह आंबेडकर रस्त्यापासून शिवाजी सर्कलपर्यंत दिवसादेखील या महिला उभ्या असतात. कळंबोली खिडूकपाडा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असणाºया कंटेनरच्या आडून हा व्यवसाय फोफावत असल्याचे दिसून आले आहे. कळंबोली पोलिसांकडून या संदर्भात कोणतीही कारवाई होत नसल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरात आठ ते दहा ठिकाणी वेश्या व्यवसायाचे अड्डे चालतात. यात बस स्थानक, रेल्वेस्थानक, शिवाजी सर्कल अशा गजबजलेल्या ठिकाणांचाही समावेश आहे. पनवेल शहरातील पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर संध्याकाळच्या वेळी अनेक महिला ग्राहकांच्या प्रतीक्षेत उभ्या असतात. त्यामुळे पोलिसांच्या हेतूवरही संशय घेतला जात आहे.दरम्यान, अनैतिक धंद्यांची गय केली जाणार नाही. वेश्याव्यवसाय करणाºया महिलांचा बंदोबस्त केला जाईल, असे परिमंडळ २ चे पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाCrimeगुन्हा