शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

पालिका निवडणुकीपूर्वीच मनसेत गटबाजी; शहराध्यक्षांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 00:51 IST

ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांविषयी नाराजी

नवी मुंबई : वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून मनस्ताप होत असल्याचे कारण देत मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे इतर पदाधिकाºयांनीही दिवसभर राजीनाम्याचे सत्र सुरू केले होते.

गतमहिन्यात मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अचानकपणे दिलेल्या राजीनाम्याची दखल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. यामुळे त्यांच्या निर्देशानुसार मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राजीनामा दिलेल्या तिघांचीही राज ठाकरे व अमित ठाकरे यांच्यासोबत बैठक घडवून आणली. त्यानंतर मनसेतून राष्ट्रवादीत गेलेल्या संदीप गलुगडे यांनी मनसेत पुनरागमन केले. तर घडलेल्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे यांनी शनिवारी काळे यांना भेटीला बोलवले. तत्पूर्वीच शुक्रवारी काळे यांनी वरिष्ठांप्रति नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला.

जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव व नेते अभिजित पानसे यांनी नवी मुंबईत लक्ष घातल्यापासून गटबाजी वाढल्याचाही आरोप काळे यांनी केला आहे. तसेच तिघांनी मनसे सोडल्याच्या कारणाला आपल्याला विनाकारण जबाबदार धरल्याचीही नाराजी व्यक्त केली. काळे यांनी राजीनाम्याची प्रत सोशल मीडियावर प्रसिद्ध करताच इतर पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे द्यायला सुरुवात केली. यामुळे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे व अमित ठाकरे यांचे स्वीय सहायक महेश ओवे यांनी काळे यांची भेट घेतली. त्यांच्यात झालेल्या बैठकीत काळे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, या संदर्भात अविनाश जाधव व गजानन काळे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

निवडणुकीत बसणार फटका

या प्रकरणावरून नवी मुंबई मनसेत दोन गट पडले असून, त्याचा फटका तीन महिन्यांवर आलेल्या महापालिका निवडणुकीत बसण्याची चिन्हे दिसत आहेत. संदीप गलुगडे, नितीन चव्हाण व श्रीकांत माने हे तिघेही काळे यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत.त्यापैकी गलुगडे यांनी मनसेत पुनरागमन केले आहे. मात्र, गतमहिन्यातल्या नाराजी नाट्यामुळे काळे व गलुगडे यांच्यात वैचारिक दरी निर्माण झाली आहे. अशातच गलुगडे यांच्या पाठीशी ठाण्यातील पदाधिकारी राहू लागल्याच्या कारणावरून काळे यांनी राजीनामा दिल्याचीही चर्चा आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAvinash Jadhavअविनाश जाधवNavi Mumbaiनवी मुंबईMNSमनसे