शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत... एकवीस वर्षांचा खडतर प्रवास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 03:08 IST

नवी मुंबई : देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. देशाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यामुळे नवी मुंबई शहराला ख-या अर्थाने जागतिक दर्जा प्राप्त होणार आहे. महाराष्ट्राचे क्षितिज रुंदावणाºया या प्रकल्पाची तब्बल २१ वर्षे रखडपट्टी झाली. अखेर नवी मुंबई शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणारा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प ...

नवी मुंबई : देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. देशाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यामुळे नवी मुंबई शहराला ख-या अर्थाने जागतिक दर्जा प्राप्त होणार आहे. महाराष्ट्राचे क्षितिज रुंदावणाºया या प्रकल्पाची तब्बल २१ वर्षे रखडपट्टी झाली. अखेर नवी मुंबई शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणारा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प खºया अर्थाने दृष्टिपथात आला आहे.नवी मुंबई विमानतळ २२६८ हेक्टर जागेवर उभारले जात आहे. विमानतळाचे गाभा क्षेत्र ११६१ हेक्टर इतके आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १६००० कोटी रुपये इतका आहे. राज्य शासन आणि सिडको भागीदार असलेल्या नवी मुंबई इंटनॅशनल एअरपोर्ट कंपनीच्या माध्यमातून या विमानतळाची उभारणी केली जाणार आहे. विमान वाहतूक क्षेत्रात मैलाचे दगड ठरणाºया या प्रकल्पाच्या कामाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. सर्व प्रथम ९१९७मध्ये या विमानतळाचा विचार पुढे आले. फेब्रुवारी १९९७मध्ये झालेल्या अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र या देशी गुंतवणूकदारांच्या परिषदेत या विमानतळाविषयी सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी म्हणजेच २००६मध्ये या विमानतळाची उपयुक्तता आणि व्यवहार्यता अहवाल सादर करण्यासाठी अभ्यास समितीची नेमणूक करण्यात आली. २००७मध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून या विमानतळ प्रकल्पाला प्रत्यक्ष मंजुरी मिळाली. त्यानंतर भूसंपादन, पुनर्वसन, आवश्यक असलेल्या विविध परवानग्या आदीमुळे प्रकल्पाचे काम रखडले. त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही २०१४पासून झाली. २०१६पासून विमानतळपूर्व कामाला सुरुवात करण्यात आली. तर २०१७मध्ये विमानतळाचा मुख्य ठेकेदार म्हणून जीव्हीके कंपनीची निवड करण्यात आली.विमानतळाची वैशिष्ट्येस्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबई शहरात उभारले जात आहे. या विमानतळावरून प्रतिवर्षी ६0 दशलक्ष प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. या विमानतळामुळे नवी मुंबईच्या विकासाला गती मिळणार आहे. उद्योगधंदे वाढीस लागणार आहेत. रियल इस्टेट क्षेत्राला चांगले दिवस येणार आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई