शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचे पत्रकारांना गिफ्ट, सिडकोचे घर घेणे होणार सोपे; जनसंपर्क विभागाच्या पात्रता प्रमाणपत्राची अट शिथिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 10:38 IST

सिडकोच्या माध्यमातून विविध आर्थिक स्थरातील घटकांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातात.  या गृहप्रकल्पांत विविध  प्रवर्गांप्रमाणेच पत्रकारांसाठीही राखीव घरे ठेवण्यात येतात.

नवी मुंबई : सिडकोच्या गृहप्रकल्पात पत्रकारांना घर घेण्याची प्रक्रिया आता सोपी झाली आहे. यापुढे सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील पत्रकार प्रवर्गातील घरासाठी अर्ज करताना राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे पात्रता प्रमाणपत्र सादर करावे लागणार नाही. याबाबतची अट राज्य सरकारने शिथिल केली असून, तसे निर्देश सिडकोला दिले आहेत.  राज्य सरकारच्या नव्या निर्देशानुसार यापुढे सिडको महामंडळाकडूनच योग्य ती शहानिशा करून पत्रकारांची पात्रता निश्चित केली जाणार आहे.  या नव्या निर्णयामुळे अनेक पत्रकारांना आता सिडकोचे घर घेणे सुकर झाले आहे. 

सिडकोच्या माध्यमातून विविध आर्थिक स्थरातील घटकांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातात.  या गृहप्रकल्पांत विविध  प्रवर्गांप्रमाणेच पत्रकारांसाठीही राखीव घरे ठेवण्यात येतात. यापूर्वी  पत्रकार प्रवर्गातील सदनिकेसाठी अर्ज करताना संबंधित पत्रकाराला सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क संचलनालयाकडून  पत्रकार प्रवर्गातील असल्याबाबतचे पात्रता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. ही प्रक्रिया वेळकाढूपणाची असल्याने हे पात्रता प्रमाणपत्र मिळविताना संबधित पत्रकारांची कसरत होत होती. यातील जाचक अटींमुळे संबंधित पत्रकाराला हे प्रमाणपत्र नाकारले जाते, परिणामी  अनेक पत्रकारांना घराच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.  पत्रकारांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात सिडकोला काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार  माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून प्राप्त कराव्या लागणाऱ्या पात्रता प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याचा निर्णय  सिडकोने घेतला आहे.  यापुढे गृहनिर्माण योजनेच्या सोडतीमध्ये यशस्वी ठरणाऱ्या पत्रकार अर्जदारांची पात्रता सिडकोकडूनच निश्चित केली जाणार असल्याने पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

टॅग्स :cidcoसिडकोHomeसुंदर गृहनियोजनState Governmentराज्य सरकार